मांस निर्यातीवर बंदी नाही,कारण डाॅलर मिळतात; ओवैसींची मोदीं सरकारवर टीका

'जो व्यक्ती दिवसाला १००-२०० रुपये कमवतोय, त्याचा धंदा तुम्ही बंद करत आहात.'
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Updated on

हैदराबाद : मध्य प्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात जे काही घडले, त्यास सरकारची मान्यता असल्याशिवाय घडलेले नाही. मध्य प्रदेशमध्ये घरे-दुकाने जाळण्यात आली. पण कोणत्या कायद्यानुसार करण्यात आले. तो कायदा तुम्ही सांगा,असे आवाहन एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मध्य प्रदेशमधील भाजप सरकारला केले आहे. ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. आस्था आहे, तर मग तुम्ही सर्वप्रथम जे मांस दुसऱ्या देशांना निर्यात करता त्यावर बंदी घाला, अशी टीका त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर केली. (Asaduddin Owaisi Attack On Narendra Modi Government Politics Of Meat)

Asaduddin Owaisi
शिवसेना म्हणजे 'ढ' सेना, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

तुम्ही मांस निर्यातीवर बंदी घालणार नाही, कारण तुम्हाला डाॅलर मिळतात. जो व्यक्ती दिवसाला १००-२०० रुपये कमवतोय, त्याचा धंदा तुम्ही बंद करत आहात, असा घणाघाती टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे. देशात सध्या मांसाहार विरुद्ध शाकाहार असा वाद पेटलेला पाहायला मिळत आहे.

Asaduddin Owaisi
UP विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाजपला बहुमत, समाजवादी पक्षाच्या पदरी निराशा

मग यातूनच जवाहरलाल नेहरु विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये मारहाणीची घटना घडली. दुसरीकडे कर्नाटकात मटण हलाल हा मुद्दा गाजत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()