‘देशातील ६६ टक्के लोकसंख्या तरुणांची, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या’

Asaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath scheme
Asaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath schemeAsaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath scheme
Updated on

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेमुळे देशातील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही तर तो आणखी वाढेल. बिहार, हरयाणात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना ओवैसींनी हरयाणा पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आंदोलकांना कपड्यांवरून ओळखू नये, गोळीबार करू नये व बुलडोझरचा वापर करू नये. देशातील ६६ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. त्यांचा दृष्टिकोन समजून घ्या, असे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. (Asaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath scheme)

अग्निपथ (Agneepath scheme) योजनेबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये तीव्र आंदोलने होत आहेत. बिहारमध्ये आंदोलकांनी अनेक गाड्या जाळल्या आणि नवादा येथील भाजपचे कार्यालय जाळले. हरयाणाच्या पलवलमध्ये डीसी कार्यालयावर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

Asaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath scheme
मोतीलाल व्होरांच्या मुलाचे राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले...

अग्निपथमुळे बेरोजगारी कमी होणार नाही तर वाढेल. पाकिस्तान आणि चीनसोबत भारताचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. आमचे सैनिक ही तुमची योजना नाही. ते तुमच्या मेंदूच्या लहरींसाठी प्रयोगशाळा नाही. अग्निपथ देशाच्या हिताचे नाही, असे ट्विट असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केले.

केंद्रीय मंत्री, भाजप (BJP) नेते आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा बचाव केला आणि सांगितले की अग्निपथ तरुणांसाठी नवीन मार्ग उघडेल. चार वर्षांच्या करारानंतर अग्निवीरांचे भविष्य असुरक्षित राहणार नाही, असे स्पष्टीकरण सरकारने जारी केले. चार वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी प्रत्येक भरतीला सुमारे ११.७१ लाखांचे पॅकेज ‘सर्व्हिस फंड पॅकेज’मधून उद्योजकतेमध्ये येण्यासाठी दिले जाणार आहे.

Asaduddin Owaisi attacks Prime Minister Narendra Modi over Agneepath scheme
लष्कराकडून हिंदू शिक्षिका बाला यांच्या हत्येचा बदला; दोन दहशतवादी ठार

योजना तातडीने मागे घेण्याची मागणी

अखिलेश यादव, अमरिंदर सिंग, मायावती आणि अरविंद केजरीवाल या राजकीय नेत्यांनी सैन्यात अल्पकालीन नोकरीसाठी नापसंती व्यक्त केली. काँग्रेस पक्षानेही ही योजना तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.