शिवसेना आता राष्ट्रवादी विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन सेनेने हात मिळवला. मुसलमान केव्हापर्यंत विश्वासघात सहन करणार. तीन लोक दाबून खात आहेत. आता कोण दाबून खातंय? उध्दव ठाकरेंसह शरद पवारांवर ओवैसींनी हल्लाबोल केला. शरद पवाराचं ह्रदय फक्त मराठ्यांसाठी धडधडतंय का असा निशाणा एमआएमचे प्रमुख असदुद्दीन ओविसी (Asaduddin Owaisi Head of AIMIM) यांनी लगावला. मराठा आरक्षणा नंतर आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम आरक्षणाच्या प्रमुख मागण्यासाठी आज मुंबईत चांदिवली सभास्थळी घेण्यात आली. या सभेत आज ओवैसींनी हल्लाबोल केला. राहुल गांधी येतील तेव्हा १४४ लागेल का? असा सवाल उद्धव ठाकरेंना ओवैसींनी केला.
आरक्षण मिळाले तर मुस्लिम समाज ऊडान भरेल. मुसलमान शिक्षण का घेऊ शकत नाही. किती मुसलमान ग्रॅज्युएट झाले? फक्त 4 टक्के मुसलमान ग्रॅज्युएट झाले आहेत. प्राथमिक शाळेत केवळ 23 टक्के मुसलमान मुली शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रात 83 टक्के मुसलमान नागरिकांकडे जमिनी नाहीत.धर्मनिरपेक्षतामुळे आपल्याला आरक्षण मिळालं? 20 टक्के मुसलमान केवळ वर्षाला 25 हजार कमावतात. मुसलमानाला शिकायचं आहे. गरीबीमुळे शिकू शकत नाहीत. धर्मनिरपेक्षतेमुळे काय मिळालं? आरक्षण मिळालं का? महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षणाबाबत बोललं जात आहे. धर्मनिरपेक्षतेचा ठेका तुम्ही घेऊन ठेवलाय का? मुसलमानाचा शिक्षणातील टक्का घसरलाय. असेहाा ते म्हणाले.
महाराष्ट्रातील खासदार फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्दा संसदेत मांडतात. मुस्लिम आरक्षणाबाबत कोणीही बोलत नाही. शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? पवार साहेब तुम्हाला दु:ख वाटत नाही का ज्यावेळी बाबरी मशिद आम्ही पाडली असं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणतात. काँग्रेस पूर्णपणे कमजोर झाली आहे. आता काँग्रेसमध्ये काहीही उरलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.