वायनाडऐवजी हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा; ओवेसी यांचे राहुल गांधींना खुले आव्हान

Rahul Gandhi and asaduddin owaisi
Rahul Gandhi and asaduddin owaisi
Updated on

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीची 2024 ची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र देशाचं राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दरम्यान, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना वायडनाडऐवजी हैदराबादमधून निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं.

Rahul Gandhi and asaduddin owaisi
Shahrukh-Salman:वर्षा बंगल्यावर करण- अर्जुन! शाहरुख सलमानने घेतलं एकनाथ शिंदेंच्या गणरायाचे दर्शन

ओवेसी हे त्यांच्या संसदीय मतदार संघ हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, सर्वात जुन्या पक्षाच्या राजवटीत उत्तर प्रदेशचा ढाचा उद्ध्वस्त करण्यात आला. मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) वायनाडमधून नाही तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान देतो. तुम्ही मोठमोठी विधाने करण्याऐवजी मैदानात या आणि माझ्याविरोधात लढा. काँग्रेसचे लोक आता काहीही म्हणतील, पण मी तयार आहे, असंही ओवेसी यांनी म्हटलं.

Rahul Gandhi and asaduddin owaisi
Dhangar Reservation : धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये टाकण्याचा प्रश्नच नाही; मंत्र्यांचं विधान

तेलंगणामध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि एआयएमआयएम समोरासमोर दिसत आहेत. दोन्ही पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी तेलंगणातील तुक्कुगुडा येथील विजयभेरी सभेत सांगितले होते की, भारतीय जनता पक्ष, भारत राष्ट्र समिती आणि एआयएमआयएम तेलंगणात एकजुटीने काम करत आहेत. काँगेस या तिघांच्या विरोधात लढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()