Narendra Modi And Asaduddin Owaisi News नवी दिल्ली : गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची सुटका केल्याने मुस्लिम समाजात चुकीचा संदेश गेला आहे. राज्यातील निवडणुकीपूर्वी भाजपने तुष्टीकरणाच्या राजकारणाखाली हे केले आहे. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महिलांच्या संकल्पाचा संदेश देतात आणि गुजरातमध्ये असा निर्णय घेतला जातो. हे दुर्दैवी आहे, असे एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
हा निकाल नाही तर बिल्किस बानोवर पुन्हा एकदा अत्याचार झाला आहे. या निर्णयाने बानोच्या जखमांवरची खपली पुन्हा काढल्या गेली आहे. गुजरातमध्ये वर्षअखेरीस निवडणुका होणार आहे. भाजपला (BJP) सलग सहाव्यांदा राज्यात सत्ता स्थापन करायची आहे. भाजपची एका विशिष्ट धर्माबाबत पूर्णपणे पक्षपाती वृत्ती आहे. याचा भाजपला कोणताही पश्चाताप नाही, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.
बिल्किस बानोसोबत सामूहिक बलात्काराची घटना ३ मार्च २००२ रोजी घडली होती. त्यावेळी २१ वर्षीय बिल्किस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती. यादरम्यान स्तनदा बाळासह बानेच्या कुटुंबातील सात जणांना मारण्यात आले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात ५९ कारसेवक जाळल्यानंतर भीषण हिंसाचार झाला होता. यानंतर बिल्किस बानोचे कुटुंब अहमदाबादजवळील शेतात लपण्याचा प्रयत्न करीत होते. याच काळात बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.