इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची आज भेट झाली.G-20 डिनर दरम्यान दोन्ही नेते भेटले आणि हस्तांदोलन केल्यानंतर काही वेळ चर्चाही केली. 2020 मध्ये गलवान मध्ये झालेल्या घटनेनंतर मोदी आणि जिनपिंग यांची झालेली ही पहिलीच भेट आहे. गलवान चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. दरम्यान या भेटीचा व्हिडिओ रिट्विट करत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर ओवेसी यांनी 'साहिबने लाल आंख नही दिखाई?' असा खोचक सवाल विचारला आहे. या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये औपचारिक भेट झाली नाही. तसेच, दोघांमध्ये नेमके काय संभाषण झाले हे अद्याप उघड झालेले नाही.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की या भेटीच्या वेळी मोदी आणि जिनपिंग यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि काही वेळ एकमेकांशी चर्चाही केली. तत्पूर्वी, पीएम मोदींनी G-20 च्या व्यासपीठावर इतर अनेक जागतिक नेत्यांचीही भेट घेतली.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी G20 परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल यांची भेट घेतली होती. मॅक्रॉन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली. येथे वार्षिक G20 शिखर परिषदेच्या एका सत्राला संबोधित करताना मोदी म्हणाले की, हवामान बदल, कोविड-19 महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे निर्माण झालेली जागतिक आव्हाने यांनी जगात कहर केला आहे आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.