तुम्ही वायनाडमधूनही हराल. तुम्ही हैदराबादमधून निवडणूक लढवा व नशीब अजमावा. तुम्ही मेडकमधूनही निवडणूक लढवू शकता, असे म्हणत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले. राहुल गांधी सध्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यामुळे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राहुल गांधींच्या तेलंगणा दौऱ्यावर निशाणा साधला.
तेलंगणामध्ये लढत फक्त काँग्रेस आणि टीआरएसमध्ये आहे. कोणाचेही नाव न घेता राहुल गांधी यांनी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि भाजप दोघेही काँग्रेसला टक्कर देऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यांनी हे वक्तव्य काल वारंगलमध्ये केले होते. याला उत्तर देताना ओवैसी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हैदराबादमधून निवडणूक लढवून नशीब अजमावण्याचे आव्हान केले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. गांधी घराण्याची पारंपरिक जागा असलेल्या अमेठीमधून राहुल यांना (Rahul Gandhi) दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक जिंकली होती. तेलंगणात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राजकीय पक्षांनी तेलंगणाचे दौरे सुरू केले असून, रणनीतीही तयार केली आहे.
टीआरएससोबत युती होऊ शकत नाही
तेलंगणा राष्ट्र समितीसोबत (टीआरएस) कोणत्याही प्रकारची युती होऊ शकत नाही. टीआरएसशी युती करू इच्छिणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी टीआरएस किंवा भाजपमध्ये सामील व्हावे. आता जर कोणी केसीआर यांच्याशी कराराचा पुरस्कार करीत असेल तर त्याला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंगलमध्ये म्हणाले होते.
बालेकिल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न
काँग्रेसचा (congress) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वारंगलमध्ये गेल्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर मागील निवडणुकीपूर्वी काँग्रेसने येथे विक्रमी आठ वेळा विजय मिळवला होता. अशा स्थितीत पुन्हा एकदा काँग्रेसने बालेकिल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.