Asaduddin Owaisi News : दिल्लीत ओवेसींच्या घरावर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या!

Asaduddin Owaisi House Stone Pelting
Asaduddin Owaisi House Stone Pelting Sakal
Updated on

Asaduddin Owaisi House Stone Pelting : AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर रविवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा काही लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या दगडफेकीनंतर ओवेसी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे. घरावर दगडफेक केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अशोक रोड परिसरात ही घटना घडली. माहितीनंतर अतिरिक्त डीसीपींच्या नेतृत्वाखाली दिल्ली पोलिसांच्या पथकाने ओवेसी यांच्या घराला भेट दिली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

या घटनेबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मी रात्री 11:30 वाजता माझ्या निवासस्थानी पोहोचलो. परत आल्यावर मला दिसले की, खिडकीच्या काचा तुटलेल्या होत्या आणि आजूबाजूला दगड पडलेले होते. माझ्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली की, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केली.

Asaduddin Owaisi House Stone Pelting
Nano-Thar Accident : टाटांच्या गाड्यांचा नादच नाय; छोटूशा नॅनोला धडकून उलटली थार

एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी म्हणाले की, त्यांच्या निवासस्थानावर हा चौथा हल्ला आहे. असा हल्ला होण्याची ही चौथी वेळ आहे... माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि ते पाहिले जाऊ शकतात. दोषींना ताबडतोब पकडले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, तत्काळ कारवाई करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. संसद मार्ग पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ओवेसी राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराची सुरुवात केली.

Asaduddin Owaisi House Stone Pelting
Best Jio Plan: जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स! मिळतो 2.5GB डेली डेटा, अमर्यादित कॉल्स अन् बरंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.