Hijab Ban Controversy: मुलींना अल्लाहने हिजाब घालण्यास सांगितलय; ओवेसींचा अजब दावा

Asaduddin-Owaisi
Asaduddin-Owaisi
Updated on

नवी दिल्ली : हिजाबबाबत सुरू असलेला वाद आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. त्यातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "माझ्या मते उच्च न्यायालयाचा निर्णय कायद्याच्या दृष्टीने चुकीचा होता आणि विषयाच्या बाबतीतही तो सदोष होता.

Asaduddin-Owaisi
Viral Video: मुख्यमंत्र्यांनी PM मोदींच्या शेजारी बसूनच खिशातून काढली पुडी अन्...

ओवेसी पुढं म्हणाले की, कुराणाच्या आयतचा आणि अनुवादाचा गैरवापर कऱण्यात आला आहे. कर्नाटकातील मुली हिजाब घालत आहेत, कारण अल्लाहने त्यांना कुराणमध्ये असे करण्यास सांगितले आहे. मात्र भाजप हळूहळू याला मुद्दा बनवत असल्याची टीका ओवेसी यांनी केली.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुरुवारी सांगितले की, शाळांमध्ये निर्धारित गणवेशाव्यतिरिक्त हिजाब किंवा इतर कोणतेही कपडे परिधान करण्यास नेहमीच विरोध केला जाईल. पक्षाने म्हटले आहे की धार्मिक स्वातंत्र्याचा वापर “फुटीरतावादी कामासाठी केला जाऊ शकत नाही.

Asaduddin-Owaisi
Hijab Case: दोन्ही न्यायाधीशांच्या मतभेदामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीचा निर्णय लागू केला होता. या निर्णयावर कर्नाटक हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. मात्र हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवस न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतभेद झाल्याने हे प्रकरण आता खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.