'हिंदुत्वासाठी मैदान तयार करणारं काँग्रेस आता...'; ओवैसींची राहुल गांधींवर जोरदार टीका

'हिंदुत्वासाठी मैदान तयार करणारं काँग्रेस आता...'; ओवैसींची राहुल गांधींवर जोरदार टीका
Updated on

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी आज हिंदु आणि हिंदुत्ववादी (Hindu, Hindutvadi) या दोहोंमधला फरक समजावून सांगितला आहे. यासाठी त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोघांचा दाखला दिला आहे. तसेच हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणदेणं नसतं ते केवळ सत्तेचे तहानलेले असतात, अशी जहरी टीका देखील राहुल गांधींनी केली आहे. (Rahul Gandhi slams BJP) मात्र, त्यांच्या या मतावर आता असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच हिंदुत्वाच्या वाढीसाठी जमीन तयार करण्याचं काम हे काँग्रेसनेच केल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी केला आहे.

'हिंदुत्वासाठी मैदान तयार करणारं काँग्रेस आता...'; ओवैसींची राहुल गांधींवर जोरदार टीका
राहुल गांधींनी सांगितला हिंदू-हिंदुत्व यातील फरक; गांधी-गोडसेंचा दिला दाखला

काय म्हणाले राहुल गांधी?

जयपूर येथे रविवारी काँग्रेसची रॅली पार पडली, यामध्ये राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, "मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्वातील फरक सांगायचा आहे. हिंदुंचा मार्ग हा सत्याचा मार्ग असतो आणि ते सत्यासाठी प्राण त्यागायलाही तयार असतात. महात्मा गांधी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवलं, तर हिंदुत्ववादी गोडसेनं त्यांच्यावर तीन गोळ्या चालवल्या. भगवत् गीता हिंदुंना सत्य शोधण्यास सांगते तर दुसरीकडं हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणदेणं नसतं ते केवळ सत्तेचे तहानलेले असतात. त्यांना भीती वाटत असल्यानं त्यांच्यामध्ये द्वेष ठासून भरलेला असतो. दरम्यान, सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, सन २०१४ पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत तर हिंदू सत्तेबाहेर आहेत. ते (हिंदुत्ववादी) खोटे हिंदू आहेत."

'हिंदुत्वासाठी मैदान तयार करणारं काँग्रेस आता...'; ओवैसींची राहुल गांधींवर जोरदार टीका
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी यशस्वी लढा दिला : योगी

असदुद्दीन औवेसींची टीका

राहुल गांधींच्या या मतावर आता असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसनेच हिंदुत्वासाठी खतपाणी घालत मैदान तयार केलंय. आता तेच या मैदानामध्ये बहुसंख्यांकवादाची पेरणी करत आहेत. 'हिंदुत्वाला सत्तेत' आणणं हा 2021 मधील नवा 'धर्मनिरपेक्ष' अजेंडा आहे. वाह! भारत हा सर्व भारतीयांचा आहे. फक्त एकट्या हिंदूंचा नाही. भारत हा देश सगळ्या धर्मश्रद्धांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा आहे तसेच ज्यांना धर्मश्रद्धा नाहीत, त्यांचाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.