Asaram Bapu : आसाराम बापूला कोर्टाचा दिलासा; पुण्यात होणार आयुर्वैदिक उपचार

Asaram Bapu : आसाराम बापूला कोर्टाचा दिलासा; पुण्यात होणार आयुर्वैदिक उपचार
Updated on

जोधपूरः अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा देत त्याला आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.

पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत. मागील काही दिवसांपासून आसारामला ह्रदयविकाराचा त्रास होत होता. आता त्याला पोलिस कोठडीमध्ये राहूनच हे उपचार घ्यावे लागणार आहेत.

Asaram Bapu : आसाराम बापूला कोर्टाचा दिलासा; पुण्यात होणार आयुर्वैदिक उपचार
UWW ची 'ती' चूक Vinesh Phogat ला रौप्यपदक मिळवून देणार; निकाल विरुद्ध लागला तर सिस्टम हलणार?

न्या. पी.एस.भाटी आणि न्या. मुन्नारी लक्ष्मण यांच्या पीठाने हे निर्देश दिले. तत्पूर्वी यंदा मार्च महिन्यामध्येच आसारामने चौदा दिवसांच्या पॅरोलची मागणी करत न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

आसाराम बापूला येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. आता कोर्टाने त्याला पुण्यात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.