Asaram Bapu Life Sentence: बलात्कार प्रकरणात आसारामला दुसऱ्यांदा जन्मठेप! काय आहे प्रकरण?

स्वयंघोषित संत आसारामला सूरत बलात्कार प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Asaram Bapu
Asaram Bapu
Updated on

नवी दिल्ली : Asaram Bapu Life Sentence: स्वयंघोषित संत आसारामला सूरत येथील आपल्या अनुयायी असलेल्या महिलेवर बलात्कार प्रकरणात स्थानिक कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊयात. (Asaram Bapu Life Sentence for the second time need to know What is the matter)

Asaram Bapu
Asaram Bapu : बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

अहमदाबादमधील चांगखेडा पोलीस ठाण्यात दाखल FIR नुसार, आसारामनं २००१ ते २००६ या काळात आपल्या आश्रमात राहणाऱ्या एका महिलेवर अनेकदा बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित महिलेच्या आरोपानंतर २०१३ मध्ये प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी ६८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. दिव्या रविया या पोलीस अधिकाऱ्यानं या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला. तपास काळात या पोलीस अधिकाऱ्याला अनेक जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन आले.

Asaram Bapu
Morbi Bridge Collapse : ओरेवा ग्रुपचे एमडी जयसुख पटेल यांचे न्यायालयापुढे आत्मसमर्पण

इतर सहा आरोपींवरही गुन्हा

या प्रकरणात आसारामशिवाय इतर सहा आरोपींवर देखील खटला चालवण्यात आला होता. पण त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये आसारामच्या पत्नीचाही समावेश आहे. इतर आरोपींमध्ये आसारामचा मुलगा नारायण साई, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि इतर चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मिरा यांचाही समावेश होता.

Asaram Bapu
Maharashtra Song : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित

आसारामविरोधात 'हे' कलम लागू

या प्रकरणी आसारामवर कलम ३४२ (व्यक्तीला डांबून ठेवणे), कलम ३५४अ (लैंगिक शोषण), कलम ३७० (४) (मानव तस्करी), कलम ३७६ (बलात्कार), कलम ५०६ (धमकावणे), १२० ब (गुन्हेगारी कट) असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

आसाराम सध्या जोधपूरच्या तुरुंगात

आसाराम सध्या राजस्थानातील जोधपूरच्या तुरुंगात वेगळ्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जोधपूरच्या केसमध्ये आसारामनं २०१३ मध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.