Asduddin Owaisi: जय पॅलेस्टाइन! ओवैसींनी शपथविधीवेळी दिलेल्या घोषणेची उलट-सुलट चर्चा; पाहा व्हिडिओ

या घोषणेची सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा शपथविधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi
Updated on

नवी दिल्ली : एआयएमआयएमचे नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सभागृहात मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय पॅलेस्टाइन असा उल्लेख केला. त्यांच्या या घोषणेची सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा शपथविधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. (Asduddin Owaisi gives slogan as Hail Palestine during swearing in ceremony watch the video)

काय म्हटलंय व्हिडिओत?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात एमआयआम या पक्षाचे प्रमुख आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मातृभाषेत अर्थात उर्दु भाषेतून शपथ घेतली. शपथेनंतर शेवटी त्यांनी 'जय भीम', 'जय मीम', 'जय तेलंगाणा', 'जय फलस्तीन', 'जय तकबीर', 'अल्लाह हू अकबर' अशा घोषणा दिल्या.

Asaduddin Owaisi
K Suresh: INDIA आघाडीचे लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार के सुरेश कोण? सर्वाधिक अनुभवी खासदार म्हणून ओळख

पॅलेस्टाईनला पाठिंबा तर इस्रायलला विरोध

पण त्यांच्या या घोषणेत त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा तर इस्राईलच्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. त्यासाठी त्यांनी 'जय पॅलेस्टाईन' असा नाराही दिला. पण शपथविधीच्या फॉरमॅटमध्ये अशा पद्धतीनं परदेशातील वादग्रस्त मुद्द्यांवरुन नारेबाजी करणं योग्य आहे का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

Asaduddin Owaisi
Shiv Sena MP: शिवसेनेच्या खासदारानं शपथविधीवेळी घेतलं बाळासाहेबांचं नाव! पुन्हा घ्यायला लावली शपथ

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतील बंडखोर संघटना हमासनं गाझापट्टीतून इस्रायलवर एकाच वेळी पाच हजार क्षेपणास्त्र डागली होती. त्यामुळं इस्रायल विरुद्ध हमास असं युद्धाची ठिणगी पडली. खरंतर हे युद्ध इस्राईल विरुद्ध पॅलेस्टाईन यांच्यातील वैचारिक आणि जमिनीवरील अधिकार सांगण्यासाठी सुरु झालेलं युद्ध आहे. यामध्ये इस्रायल ही ज्यू लोकांची तर पॅलेस्टाईन ही मुस्लिमांची भूमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.