लखीमपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश एसआयटीने आरोपपत्र दाखल केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5000 पानांच्या आरोपपत्रात एसआयटीने गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी केलं आहे. एवढेच नाही, तर एसआयटीच्या म्हणण्यानुसार आशिष घटनास्थळी उपस्थित होता. (Ashish Mishra in Lakhimpur Kheri Violence)
लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. याआधी केंद्रीय अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह १३ आरोपींविरोधातील गुन्ह्यातून एसआयटीने आता अपघाताची कलमे हटवली होती.
याऐवजी आता हत्येचा प्रयत्न आणि एकत्र येऊन गुन्हा कऱणे इत्यादी कलमे लावण्यात आली. तसेच रिमांडची मागणीही करण्यात आली होती. एसआयटी चौकशी अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना जाणीवपूर्वक आणि कट रचून घडवून आणल्याचं म्हटलं. त्यानंतर आता एसआयटीने जवळपास 5000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला होता.
एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर सध्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हा कट असल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. एसआयटीने याबाबतची माहिती तपासावर देखरेख करणाऱ्या न्यायाधीशांना दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.