नवी दिल्ली - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर बुधवारी (२८ सप्टेंबर) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या मुद्द्यावर विविध वृत्तवाहिन्यांवर वादविवादही झाले. त्यात सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत पीएफआयवर जोरदार निशाणा साधला, तसेच काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी उपाध्याय म्हणाले की, देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे.
उपाध्याय म्हणाले, "काय कारण आहे की आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले. कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्ष होतील. मात्र हेच दिग्विजय सिंह पीएफआयसोबत स्टेज शेअर करतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत.
अश्विनी उपाध्याय म्हणाले की, बाटला हाऊसला दिग्विजय सिंह यांनी फेक इन एन्काउंटर म्हटले होते. मुंबई हल्ल्याला फेक सांगितलं होतं. ते ओसामाला ओसामाजी म्हणतात, दाऊदला दाऊदजी म्हणतात.
दरम्यान मी फक्त हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की पीएफआय संपली. परंतु पीएफआयचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस अध्यक्ष होणार आहे. याचं काही तरी कनेक्शन आहे. या देशात सुख-शांती धर्मनिरपेक्ष संविधानामुळे नाही, तर भारतातील धर्मनिरपेक्ष हिंदूंमुळेच आहे. जे पूर्वी ९० टक्के होतं, ते आता ते 78 टक्क्यांवर आले आहे.
जिथे हिंदू संपले, तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदू समूह संपषुट्ता आला, तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच, असंही अश्विन यांनी म्हटलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.