कऱ्हाड (सातारा) : आसाम आणि मिझोरमच्या (Assam and Mizoram) सीमावर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केली आहे. सोमवारी आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबार झाला. त्या घटनेत मुळचे पुण्याचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर (Superintendent of Police Vaibhav Nimbalkar) जखमी झाले आहेत. (Assam And Mizoram Border Dispute MLA Prithviraj Chavan Demanded The Resignation Of Home Minister Amit Shah bam92)
आसाम आणि मिझोरमच्या (Assam and Mizoram) सीमावर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
त्यांचे दोन सुरक्षारक्षक पोलिसांसह काही पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्या घटनेवरून आमदार चव्हाण यांनी ट्विटवरून गृहमंत्री शहा यांच्यावर निशाणा साधला. आमदार चव्हाण यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार चव्हाण यांनी ट्विटमध्ये आसाम आणि मिझोरमच्या सीमावर्ती भागात सातत्याने संघर्ष होत आहे. त्यातून हिंसाचार घडत आहे.
पूर्वोत्तर भागामधील शांतता भंग होऊ लागली आहे. प्रथमच दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यात काहींना गंभीर इजा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
Assam And Mizoram Border Dispute MLA Prithviraj Chavan Demanded The Resignation Of Home Minister Amit Shah bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.