Maharashtra Politics : आसामचे CM सरमांची प्रतिक्रिया, म्हणाले...

assam chief minister himanta biswa sarma said on role in maharashtra political crisis
assam chief minister himanta biswa sarma said on role in maharashtra political crisis Sakal
Updated on

गुवाहाटी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यावरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हेही विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. विरोधी पक्षांच्या वतीने गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सत्तापालटात मदत केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माझे प्राधान्य हे आसामचे लोक असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.

सीएम सरमा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की , "आसामच्या लोकांना माझी प्राथमिकता माहीत आहे. लोक सरकारवर खूप खूश आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या लोकांना हे माहीत आहे की मी 24 तास जमीनीवर काम करत आहे."

ते म्हणाले की, माझी सिलचरची ​ही दुसरी भेट आहे. वीज पूर्ववत करणे हे आमचे प्राधान्य आहे. मला वाटतं बराक नदीला पूर आला आहे. पाऊस बंद झाल्यानंतर पुढील २४ तासांत सिलचरमधील परिस्थिती सुधारेल अशी मला आशा आहे, असेही ते म्हणाले आहेत.

assam chief minister himanta biswa sarma said on role in maharashtra political crisis
राज्यपालांना आज डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना वेग येणार?

आसाममधील पूरस्थिती रविवारी भीषण राहिली आणि राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 40 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. सिलचर हे सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पूर आणि भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या आसामधील 637 मदत छावण्यांमध्ये 2.33 लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.

यादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये भाजपने सहभाग असल्याचा कोणताही आरोप फेटाळून लावला आहे. मात्र सरमा यांच्या जवळचा मानला जाणारा एक तरुण खासदार बंडखोरांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

assam chief minister himanta biswa sarma said on role in maharashtra political crisis
शिवसेनेला आणखी एक धक्का, मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील

दरम्यान आज कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उदय सामंत हे रविवारी गुवाहाटीसाठी रवाना झाले होते. शिंदे गटात सहभागी होणारे सामंत हे आठवे मंत्री आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.