Love jihad : मुस्लिम पुरुष हिंदू मुलीची हत्या करतो, तेव्हा आम्ही..; असं का म्हणाले CM सरमा?

प्रत्येकजण (असदुद्दीन) ओवैसी असेल असं नाही. प्रत्येकजण (ओसामा बिन) लादेन असेल असं नाही.
Himanta Biswa Sarma on Love jihad
Himanta Biswa Sarma on Love jihadesakal
Updated on
Summary

प्रत्येकजण (असदुद्दीन) ओवैसी असेल असं नाही. प्रत्येकजण (ओसामा बिन) लादेन असेल असं नाही.

Himanta Biswa Sarma on Love jihad : श्रद्धा वालकर हत्याकांडावर (Shraddha Walker Murder Case) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपलं परखड मत व्यक्त केलंय. हा साधा गुन्हा आहे की लव्ह-जिहाद (Love jihad) हा वाद सुरूच राहील, पण कधीही न संपणारा हा मुद्दा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

श्रद्धा वालकरची दिल्लीत तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) यानं हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फेकून दिले. मुख्यमंत्री हिमंता सरमा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'मी या प्रकरणाला लव्ह-जिहाद म्हटलंय आणि तुम्ही याला साधा गुन्हा म्हणत आहात, त्यामुळं काय आता ते जनतेला ठरवू द्या.'

Himanta Biswa Sarma on Love jihad
India-China Clashed : चीनविरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका; म्हणालं, भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही..

सरमा पुढं म्हणाले, 'प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितीच्या आधारे मी या निष्कर्षावर पोहोचलोय की, श्रद्धा वालकरची ही हत्या जिहादचं प्रकरण आहे. एखादी लव्ह-जिहादची केस असेल, तेव्हा आपण त्या केसचे काही मापदंड, तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेत असतो. त्याला प्रतिवाद करून तुम्हाला हे सिद्ध करायचंय की, हे लव्ह जिहादचं प्रकरण नाही, तर केवळ गुन्हेगारी प्रकरण आहे. हा धर्मनिरपेक्षतावादी आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आहे. हा वाद सुरूच राहणार आहे.'

Himanta Biswa Sarma on Love jihad
Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा!

जेव्हा एखादा हिंदू माणूस त्याच्या प्रेयसीची हत्या करतो, तेव्हा आम्ही त्याचं गुन्हेगारी कोनातून विश्लेषण करू. पण, जेव्हा एखादा मुस्लिम व्यक्ती हिंदू मुलीची हत्या करतो, तेव्हा त्याचं विश्लेषण गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून आणि लव्ह-जिहादच्या कोनातूनही करू. मुस्लिम समाजातील एक वर्ग उघडपणे म्हणतो की, ते जिहादी आहेत. प्रत्येकजण (असदुद्दीन) ओवैसी असेल असं नाही. प्रत्येकजण (ओसामा बिन) लादेन असेल असं नाही. ओवैसी कट्टरपंथी आहेत. मी त्यांना जिहादी म्हणणार नाही, असंही सरमा यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.