Al Qaeda : दहशतवादी कट उधळला? आसाममध्ये अल कायदाशी संबंधित 34 जणांना अटक

पोलिसांनी अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना अटक केलीय.
Al Qaeda Terrorists
Al Qaeda Terroristsesakal
Updated on
Summary

पोलिसांनी अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना अटक केलीय.

नवी दिल्ली : आसाम पोलिसांनी (Assam Police) अल कायदाशी (Al Qaeda) संबंधित 34 हून अधिक लोकांना अटक केलीय. डीजीपी भास्कर ज्योती महंता (DGP Bhaskar Jyoti Mahanta) यांनी सांगितलं की, अल कायदाशी संबंधित 34 हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आलीय.

आसाम पोलिस असा कट यशस्वी होऊ देणार नाहीत. बांगलादेशनं इथं काही लष्करी छावण्याही उभारल्या आहेत. राज्यात काही नवीन गट झपाट्यानं वाढत असून ते तरुणांना कट्टर बनविण्याचं काम करत आहेत. डीजीपी पुढं म्हणाले, आसाममध्ये विविध प्रकारचे मदरसा गट आहेत. काही नवीन गट खूप वेगानं वाढत आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत. हा कट आसामबाहेर रचला जात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Al Qaeda Terrorists
भाजपचं 'ऑपरेशन लोटस्' फेल, 'आप'च्या बैठकीत किती आमदार पोहोचले? भारद्वाजांनी सांगितला आकडा

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा गुरू ठार

काही महिन्यापूर्वी अमेरिकेनं अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केलंय. रविवारी (31 जुलै) अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएनं अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे. "अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने जवाहिरीचं हात रंगले होते. आता लोकांना न्याय मिळाला आहे. हा कट्टरतावादी आता जगात राहिला नाहीये," असं बायडन यांनी म्हटलं होतं.

Al Qaeda Terrorists
Asaduddin Owaisi : भाजप नेत्याला अटक होताच ओवैसींनी मुस्लिम समाजाला केलं 'हे' आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.