'काँग्रेस भाजपला पराभूत करू शकत नाही, म्हणूनच मी राजीनामा दिला'

Ripun Bora
Ripun Boraesakal
Updated on
Summary

'भाजपमुळं संविधान, लोकशाही आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका आहे.'

नुकतेच काँग्रेसला (Congress Party) सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress Party) दाखल झालेले आसाम काँग्रेसचे माजी प्रमुख रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. काँग्रेस भारतीय जनता पक्षाला पराभूत करू शकत नाही, याची खात्री पटल्यावर त्यांनी पक्ष बदलल्याचं आज आवर्जून सांगितलं.

बोरा म्हणाले, काँग्रेस आता भाजपला (BJP) पराभूत करण्यास सक्षम नाहीय. त्यामुळंच मी टीएमसीमध्ये प्रवेश केलाय. वैचारिकदृष्ट्या मी काँग्रेससोबत राहिलो तर काहीही करू शकत नाही. माझं सर्व कार्य, क्षमता आणि प्रयत्न व्यर्थ जातील. त्यामुळं संविधानाचं रक्षण करणार्‍या पक्षात, भाजपला रोखू शकणार्‍या पक्षात सामील व्हावं, असं मी ठरवलंय. माझ्यासाठी टीएमसी हा पक्ष अधिक चांगला आहे.

Ripun Bora
'मी रामाला देव मानत नाही'; मांझींच्या वक्तव्यावर गिरीराज सिंह संतापले

रिपून बोरा यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हंटलंय, भाजपमुळं संविधान, लोकशाही आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका आहे. मला आशा होती की काँग्रेस भाजपला रोखू शकेल; पण दुर्दैवानं भाजपशी लढण्याऐवजी काँग्रेस सर्व राज्यात भांडत बसलीय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सर्वात योग्य आहेत, असंही टीएमसी नेत्यानं आवर्जून सांगितलं. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस सोडताना बोरा यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिलंय, मी विद्यार्थी जीवनापासून (1976) काँग्रेससोबत आहे. मी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मात्र, जड अंत:करणानं आज पक्षाचा राजीनामा देत आहे. सोनिया गांधींना (Sonia Gandhi) दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी पुढं म्हंटलंय, माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचं आणि काँग्रेस नेतृत्वाचं आभार मानू इच्छितो, असं नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.