आपला देश हा चहा प्रेमींचा आहे, त्यातही आसाममधील चहाचे प्रेमी जगभरात देखील आढळतात. आसामधील चहाचे मळे जगप्रसिद्ध आहेत आणि येथील चहाला जगभरातून मागणी असते. असे असताना आसाममध्ये चहाच्या लिलावात मनोहारी गोल्ड टी (Manohari Gold Tea) हा खास चहा प्रतिकिलो 99,999 रुपये इतक्या विक्रमी किंमतीला विकला गेला आहे. ही आजपर्यंतच्या इतिहासीतील सर्वाधिक बोली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मनोहारी मनोहारी चहाने आधीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
गेल्या वर्षी, मनोहरी गोल्ड टी ला तब्बल 75,000 रुपय प्रति किलोग्रॅम दराची बोली लागली होती, जो त्या विक्री केंद्रावरील त्या वर्षातील सर्वोच्च दर होता. तर यावर्षी मनोहारी गोल्ड टी 99,999 रुपय प्रतिकिलो या विक्रमी किंमतीत सौरव टी ट्रेडर्स यांनी विकत घेतला.
मनोहरी टी इस्टेटचे मालक राजन लोहिया यांनी सांगीतले की, आम्ही पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मंगळवारी गुवाहाटीत झालेल्या लिलावामध्ये आमच्या 1 किलो गोल्ड चहाला 99,999 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. आम्ही नेहमीच गुणवत्तेला महत्त्व देतो, आम्ही गुणवत्तेशी तडजोड करू शकत नाही. आज आम्ही खूप आनंदी आहेत कारण आम्ही आसाम चहासाठी गौरव निर्माण केला आहे. पुढे ते म्हणाले की, चहाच्या उत्पादनासाठी आसामचे हवामान आणि माती परिपूर्ण आहे.
चहा उद्योगाच्या संकटाबद्दल विचारले असता लोहिया यांनी सांगीतले की, फक्त दर्जेदार चहाच आसामच्या चहा उद्योगाला वाचवू शकतो. आसामचा चहा त्याच्या समृद्ध गुणवत्तेमुळे जगात प्रसिद्ध असल्याचे ते म्हणाले. दरम्यान मनोहरी टी इस्टेट ही तब्बल 1,000 एकर जमिनीवर पसरलेले आहे, जेथे सुमारे 600 कामगार काम करतात. 2018 मध्ये, याच ब्रँडच्या 1 किलो चहाचा 39,000 रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला होता आणि त्या वेळी देखील सौरभ टी ट्रेडर्सनेच तो विकत घेतला होता. एका वर्षानंतर, त्याच कंपनीने लिलावात पुन्हा एक किलो चहा 50,000 रुपयांना विकत घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.