नवी दिल्ली : झारखंडमध्ये (Jharkhand) धनबाद येथे न्यायाधीश (judge) उत्तम आनंद यांच्या हत्याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दखल घेतली असून न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडून याबाबतचा स्थिती अहवाल मागविला आहे. (Assassination judges Report requested Supreme Court)
त्यांना यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात आला आहे. न्या. आनंद हे २८ जुलै रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना भरधाव वेगातील ऑटो रिक्षाने धडक दिली होती, या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या न्या. आनंद यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी आपण जाणीवपूर्वक न्या. आनंद यांना धडक दिल्याची कबुली दिली आहे.
सध्या झारखंड उच्च न्यायालय देखील या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून असून हा न्यायालयीन पातळीवरील तपास भविष्यात सुरूच राहील असे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी म्हटले आहे. आम्ही स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतो आहोत असे सांगतानाच सरन्यायाधीशांनी देशभरात वैधानिक अधिकारी आणि न्यायाधीशांवर हल्ले होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा घटनांवर लक्ष ठेवले जायला हवे असे स्पष्ट मत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. झारखंडचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांनी या संदर्भातील तपासाचा अहवाल आठवडाभरात सादर करावा असेही निर्देशांत नमूद करण्यात आले आहे.
सरकारच्या भूमिकेवर नाराजी
देशभरात वैधानिक अधिकाऱ्यांवर होत असलेल्या हल्ले आणि त्यांना संरक्षण देण्याबाबत राज्य सरकारांचा उदासीन दृष्टिकोन यावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यात जेव्हा आमच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल तेव्हा राज्याच्या ॲडव्होकेट जनरलनी देखील उपस्थित राहावे असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.