नवी दिल्ली: एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने (women police constable) सासऱ्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर याच मुद्यावरुन पीडित महिलेच्या नवऱ्याने तिहेरी तलाकचं (triple talaq) उच्चारण करुन तिला घटस्फोट दिला. आपण घरामध्ये एकटे होतो, ती संधी साधून सासऱ्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने (women) केला आहे. आरोपी सासरे सुद्धा पोलीस दलातच आहेत. बुधवारी रात्री उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली. (assault by father-in-law woman constable gets triple talaq from husband in uttar pradesh)
पीडित महिला उत्तर प्रदेश पोलीस दलात आहे. या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केली, तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे महिलेने म्हटले आहे. महिलेने तिच्याबरोबर घडलेला प्रकार नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितला. नवरा सुद्धा पोलीस अधिकारी आहे. पण पत्नीला मदत करण्याऐवजी त्याने बंदी घातलेल्या तिहेरी तलाकचा वापर करुन महिलेला घटस्फोट दिला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आरोपी सासरा आणि महिलेच्या पतीविरोधात पोलिसांनी तपास सुरु केला आहे, असे पोलीस अधिकारी विनीत भटनागर यांनी सांगितले. पीडिल महिलेचं तीन वर्षापूर्वी लग्न झालं आहे. लग्न झाल्यापासून सासू-सासरे हुंड्यासाठी छळ आणि मारहाण करायचे, असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.