BJP-JDS वर नाराज असलेले काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार; कॅबिनेट मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

आपल्याला काँग्रेसमध्ये (Congress) येण्याची ऑफर आली असून आपण त्यावर विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Karnataka Bommai Government KC Narayana Gowda
Karnataka Bommai Government KC Narayana Gowdaesakal
Updated on
Summary

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच आता बोम्मई सरकारमधील मंत्र्यानं जेडीएस आणि भाजप आमदारांमध्ये (BJP MLA) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवलीये.

बेंगळुरु : कर्नाटकातील बोम्मई सरकारमधील (Karnataka Bommai Government) कॅबिनेट मंत्री केसी नारायणगौडा (KC Narayana Gowda) यांनी राज्यात मोठ्या राजकीय संकटाचे संकेत दिले आहेत.

आपल्याला काँग्रेसमध्ये (Congress) येण्याची ऑफर आली असून आपण त्यावर विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्री नारायणगौडा यांनी हे विधान अशावेळी केलंय, जेव्हा 12 मार्चला मंड्या जिल्ह्यात पंतप्रधान मोदींची (PM Modi) जाहीर सभा होणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे'चं (Bangalore-Mysore Expressway) उद्घाटन करणार आहेत.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच आता बोम्मई सरकारमधील मंत्र्यानं जेडीएस आणि भाजप आमदारांमध्ये (BJP MLA) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवलीये. दरम्यान, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री केसी नारायणगौडा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेतही दिले आहेत. भाजप मंत्र्यानं सांगितलं की, मला काँग्रेसकडून प्रस्ताव आला असून, त्यावर समर्थकांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे. अद्याप काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. समर्थकांशी चर्चा करूनच कोणताही निर्णय घेईन, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Karnataka Bommai Government KC Narayana Gowda
Congress : देशातल्या निवडणूक निकालांवर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; रमेश म्हणाले, आम्हाला बहुमताची अपेक्षा..

तत्पूर्वी, जेडीएसचे बंडखोर नेते बीएल देवराजू यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत दिले. त्यानंतर जेडीएसचे आमदार केएम शिवलिंगेगौडा (KM Shivalingegowda) यांनी सांगितलं की, मी जेडीएस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, अद्याप मी अंतिम निर्णय घेतलेला नाही. मी लवकरच काँग्रेस नेत्यांशी चर्चा करेन आणि पक्ष प्रवेशाची तारीखही जाहीर करेन, असं त्यांनी जाहीर केलं.

Karnataka Bommai Government KC Narayana Gowda
Meghalaya Election : मेघालयात फक्त 2 जागा जिंकणाऱ्या भाजपचा NPP ला पाठिंबा; संगमा होणार CM

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()