Election: विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान

मातब्बरांच्या लढतींमुळे रंगतदार सामने
Election
ElectionEsakal
Updated on

दर पाच वर्षांनी सत्ता बदलाची अहमहमिका असलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची दक्षिणेतील ही ‘सेमी फायनल’ असल्याचे मानले जात असल्याने या निवडणुकीस मोठे महत्त्व आले आहे. गेल्यावेळी कर्नाटकमध्ये भाजपकडून ‘आॅपरेशन कमळ’द्वारे सत्ता हस्तगत करण्यात आली होती. हिजाब, मुस्लिमांचे आरक्षण, गैरव्यवहार व गैरकारभार अशी वेगवेगळी आव्हाने असलेल्या भाजपसमोर लिंगायत समाजाच्या बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीच्या रंगतीचे चित्र आज स्पष्ट झाले.

काँग्रेसला मोठी संधी असली तरी केंद्रीय नेतृत्वाची कमतरता आणि प्रचारासाठी नसलेला स्थानिक पातळीवरील मुद्दा या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात नेतेपदासाठी रस्सीखेच होणार, हे निश्‍चित! अकार्यक्षम आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या बी. एस. येडीयुरप्पा यांना भाजपला पुन्हा केंद्रस्थानी आणून ठेवावे लागले आहे. लिंगायत व्होट बँकेस नजरेसमोर ठेवून हे पाऊल उचलावे लागले आहे. मुलगा बी. वाय. विजयेंद्र (शिकारीपूर) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र श्री. येडीयुरप्पा राजकारणात भाजपकडून सक्रिय झाले आहेत.

Election
Congress: कमी जागा काँग्रेसला अमान्य! नितीशकुमारांबाबत सावध भूमिका; किमान ३७० जागांचा श्रेष्ठींचा आग्रह

लिंगायत व वक्कलिग या दोन समाजाचे कर्नाटकात प्राबल्य आहे. त्यातील लिंगायत समाज भाजपकडे तर वक्कलिंग समाज धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे आकर्षित आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्याने तब्बल सहावेळा विजयी झालेले भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (हुबळी) तसेच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (अथणी) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

भाजपची ज्या लिंगायत समाजावर मदार होती, त्या समाजाचे म्‍हणजे कर्नाटक वीरशैव संघाचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा (वय ९२) यांना काँग्रेसने दक्षिण दावणगिरीतून उमेदवारी दिली आहे. श्री. शेट्टर यांच्या विरोधात लिंगायत समाजाचे महेश टेंगीनकाई यांना भाजपने विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने यादगिरी मतदारसंघातून माजीमंत्री ए. बी. मलकरेड्डी (वय ८१) यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस व भाजपचे काही बंडखोर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या हाती लागले आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचा बालेकिल्ला असलेल्या म्हैसूर, मंड्या, हसन, कोलार या भागात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या प्रभावाचीही यंदा कसोटी लागेल. धजदच्या विजयी संख्येवर कर्नाटकच्या सत्तासुंदरीचा सोपान कोण सर करेल, याचे औत्सुक्य कायम असेल.

Election
Sharad Pawar: 'अजित पवार शरद पवारांनाच संभ्रमात ठेवतात', भाजपा नेत्याचं मोठं वक्तव्य

कर्नाटकातील उमेदवारात संपत्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे डी. के. शिवकुमार यांची माजी गृहमंत्री आर. अशोक (कनकपूर) तसेच सिद्धरामय्या (काँग्रेस) यांच्या विरोधात मंत्री व्ही. सोमन्ना (भाजप) यांच्यातील लढती रंगणार आहेत. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. खर्गे यांच्या नावाची शिफारस करून बॉम्बच टाकला आहे.

मोदी-योगी फॅक्टरवर मदार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सध्यातरी ‘अच्छे दिन’ असल्याचे सर्व्हेमधून जाणवत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्बल २६ सभांचे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दहा-बारा सभांचे नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आठ दिवस ठाण मांडून बसणार आहेत. मोदी-योगींच्या सभांच्या प्रभावाचा करिष्माच भाजपला तारणार असल्याची चर्चा आहे.

पारंपरिक लढती

गेल्यावेळी अत्यंत अटीतटीच्या लढतीत बाजी मारलेल्या काँग्रेसच्या व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील (गदग) यांच्याविरोधात पुन्हा अनिल मेणसिनकाई (भाजप) रिंगणात उतरले आहेत. केवळ १५०० मतांनी श्री. पाटील गेल्यावेळी विजयी झाले होते. आळंद मतदारसंघातून सुभाष गुत्तेदार (भाजप) व बी. आर. पाटील (काँग्रेस) तसेच अफझलपूर मतदारसंघात मलिकय्या गुत्तेदार (भाजप) व एम. वाय. पाटील (काँग्रेस) यांच्यातील पारंपरिक लढत लक्षणीय ठरेल.

लक्ष्यवेधी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची कसोटी

भाजपकडून ७१ नव्या चेहऱ्यांना संधी

वयाच्या अटीमुळे अनेक ज्येष्ठांचे पत्ते कट

जी. एस. तिप्पारेड्डी (चित्रदुर्ग) व गोविंद करजोळ (मुधोळ) या ज्येष्ठांना पुन्हा संधी

भाजपकडून २९ विद्यमान आमदारांची उमेदवारी कट

गुरुराज घंटीगोळी (पैंदूर) व भारती मुरुळे (सुळ्य) हे अत्यंत गरीब उमेदवार भाजपकडून रिंगणात

कर्नाटकात काँग्रेसला पूरक वातावरण

‘अँटी इन्कम्बन्सी़‘चा होईल लाभPakistan Bomb Blast: पाकिस्तानात पोलीस स्टेशमध्ये बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी

Election
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनवर बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()