नवी दिल्ली : पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांवर सध्या निवडणूक आयोगानं बंदी कायम ठेवली आहे. आज संदर्भात आयोगाची बैठक पार पडली यावेळी ही बंदी ११ फेबुवारीपर्यंत पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Assembly Elections 2022 ECI extends ban on rallies till Feb 11)
निवडणूक आयोगानं जानेवारी २०२२ मध्ये सभा, पदयात्रा, रोड शोंवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. बंदीची ही डेडलाईन आज संपणार होती, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक आज पार पडली असून यामध्ये ही बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच या बैठकीत ठरल्यानुसार आता फिजिकल रॅलीजला जास्तीत जास्त १००० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर इनडोअर बैठकांना ५०० लोकांची मर्यादा तसेच डोअर टू डोअर प्रचाराला २० लोकांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
बंदी उठवण्याची निवडणूक आयोगाला घाई नव्हती
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा तसेच निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या राज्यांमधील लसीकरण मोहिमेचा निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. याबाबत आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत चर्चा केली. यामध्ये संबंधीत पाच राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी अपेक्षेप्रमाणं निवडणूक आयोग ही बंदी उठवण्यासाठी घाई केली नाही.
गेल्या आठवड्यात लागू केली होती बंदी
गेल्या शनिवारी निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना २८ जानेवारीपासून पुढे सार्वजनिक बैठकांना परवानगी दिली होती. यासाठी खुल्या मैदानात जास्तीत जास्त ५०० लोकांची उपस्थिती तर जागेच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के इतक्या लोकांना उपस्थिती लावण्यास मुभा दिली होती. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पक्ष किंवा उमेदवारांना १ फेब्रुवारीपासून हीच शिथीलता लागू होणार आहे. यामध्ये दारोदारी प्रचारासाठी जाताना पाच ऐवजी आता दहा लोकांना जाता येणार आहे. तसेच खुल्या जागेत व्हिडिओ व्हॅनसाठी कोरोनाचे नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूका १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान सात टप्प्यांत पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.