उत्तर प्रदेश आणि इतर पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मागील बऱ्याच काळापासून या राज्यात इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, आता मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. विशेष करुन उत्तर प्रदेशमधील महत्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी वाढल्याचे दिसत आहेत. इंधन किरकोळ विक्रेत्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 15 ने वाढवाव्या लागतील, असे उद्योग तज्ञांनी सोमवारी पीटीआयला सांगितले.
दरम्यान इंधनाचे दर वाढण्यामगचे कारण तेल कंपन्यांनी उत्रर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दर स्थिर ठेवल्याने होणारा तोटा भरुन काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तसेच तेल कंपन्यांना रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती गगनाला भिडलेल्या असून त्या US$140 प्रति बॅरलच्या 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत, यामुळे देखील तोटा सहन करावा लागतोय.
तसेच, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 76.96 च्या आजीवन नीचांकी पातळीवर गेला आहे. या पूर्वीचा नीचांक एप्रिल 2020 मध्ये 76.90 होता, जेव्हा कोविड महामारीने जगातील अर्थव्यवस्था कोसळली होती.
तेल कंपन्यांनी मान्य केले आहे की त्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि काही आतील सूत्रांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, जर ते कमी करायचे असतील तर त्यांना इंधन दरात किमान 10 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात ICICI सिक्युरिटीजच्या अहवालात प्रति लिटर 15.1 रुरयांची वाढ अपेक्षित आहे.
भारत आपल्या तेलाच्या सुमारे 85 टक्के गरजा पूर्ण करण्यासाठी परदेशातील खरेदीवर अवलंबून आहे, ज्यामुळे ते आशियातील वाढत्या किमतींचा भारतातील जनतेला लगेच फटका बसू शकतो. तेल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 3 मार्च रोजी भारताने खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल US$ 117.39 वर पोहोचली, ही किंमत 2012 नंतरची सर्वोच्च आहे.
अर्थव्यवस्थेला वाढत्या तेलाच्या किमती आणि कमकुवत होणारा रुपया असा दुहेरी प्रहार ठरणार आहे. ज्यामुळे देशाच्या आधीच अडचणीत असलेले अर्थकारण ज्यावर कोरोना महामारीचा देखील परीणाम झाला आहे त्याचे आणखी नुकसान करु शकतो. दरम्यान देशातील इंधनाची मागणी 5.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असताना या वर्षाच्या अखेरीस काहीसा दिलासा मिळू शकतो, परंतु वाढीव विक्रीनंतर देखील तेल कंपन्या किमती कमी करतील की नाही हे स्पष्ट नाही. 2022-23 मध्ये इंधनाचा वापर मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात 203.2 दशलक्ष टन (अपेक्षित) वरून 214.5 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
निवडणुकीनंतर इंधनाच्या किमती वाढण्याची भीती अनेकांना वाटत होती, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे या विषयावर सतत बोलत आहेत. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी लोकांना त्यांच्या कार आणि बाइतमझ्ए पेट्रोल आणि डिझेलचा साठा करण्याचा सल्ला दिला होता. निवडणूकीची ऑफर संपत आली आहे असे ते म्हणाले होते. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या (स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या) किमती गेल्या वर्षी गगनाला भिडल्या, त्यामुळे सरकारला सामान्य नागरिक आणि विरोधकांचा रोष सहन करावा लागला होता.
निवडणुका जवळ आल्याने किमती स्थिर झाल्या, पण निवडणूका संपताच त्या आता पुन्हा वाढू शकतात. युक्रेनमधील संघर्ष, जो आता सलग 13 व्या दिवशीही सुरु आहे, त्याचा परिणाम देश आणि जगभरातील अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर झाला आहे; भारतात लोक स्वयंपाकाच्या तेलाचा साठा करण्यासाठी गर्दी करत आहेत .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.