सध्या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. यातील गोवा, यूपी आणि पंजाबच्या निवडणूकीतील उमेदवारांत चुरस निर्माण झाली आहे. पंजाब विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री जगमोहन सिंग कांग यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. जगमोहन कांग यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले यादविंदर सिंग कांग आणि अमरिंदर सिंग कांग यांनीही आपमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती समोर येत आहे.
आपचे नेते राघव चड्डा यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. पंजाबमध्ये दिवसेंदिवस आम आदमी पक्ष आणखी मजबूत होत आहे. आपचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी आपची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसपासून नाराज असलेले जगमोहन सिंग कांग हे आमदार आणि कॅबिनेट मंत्री झाले. परंतु आता ते दोन्ही युवक काँग्रेस नेते यादवींद्र आणि अमरिंदर यांच्यासह आप मध्ये सामील झाले. यांच्यामुळे आम आदमी पक्षाला आणखी ताकद येईल.
चन्नी यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप होता
मोहाली जिल्ह्यातील खरार मतदारसंघातून काँग्रेसने विजय शर्मा यांना तिकीट दिले आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे कांग आणि मुलगा यादविंदर सिंग कांग खरारमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.