मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी यांची 19,111 कोटींची मालमत्ता जप्त

assets worth 19111 crore rupees of vijay mallya nirav modi and mehul choksi attached rak94
assets worth 19111 crore rupees of vijay mallya nirav modi and mehul choksi attached rak94
Updated on

बँक कर्जाची परतफेड न करता परदेशात पळून गेलेले व्यापारी विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची 19,111.20 कोटी रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारने मंगळवारी दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, या तिन्ही व्यावसायिकांनी त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून चुकीच्या पद्धतीने पैसे काढून फसवणूक केली . यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण 22585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (PMLA) कारवाई

त्यांनी सांगितले की, 15 मार्च 2022 पर्यंत, यापैकी, 19111.20 रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आली आहे. ते म्हणाले की, यापैकी 15,113.91 कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आली आहे. यासोबतच 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करून भारत सरकारला देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

assets worth 19111 crore rupees of vijay mallya nirav modi and mehul choksi attached rak94
बापरे! जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी 63 शहरं भारतात!

केंद्रीय मंत्री सांगितले की, 15 मार्च 2022 पर्यंत, या प्रकरणांमध्ये फसवणूक करुन काढण्यात आलेल्या रकमेपैकी 84.61 टक्के रक्कम जप्त करण्यात आली आहे आणि बँकांच्या एकूण तोट्यापैकी 66.91 टक्के रक्कम बँकांना परत करण्यात आली आहे. ते म्हणाले की, विशेष बाब म्हणजे एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या गटाने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्याकडे सोपवलेल्या मालमत्तेची विक्री करून 7975.27 कोटी रुपये वसूल केले आहेत.

assets worth 19111 crore rupees of vijay mallya nirav modi and mehul choksi attached rak94
Realme GT Neo 3 : फक्त 5 मिनिटांत होतो 50% चार्ज, किंमत किती? वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.