कोणताही सण, समारोह असला की, महिलांमध्ये कपड्यांवरून चर्चा रंगतात. लग्न समारंभात तर कोणाचा लेहंगा किती महाग हा विशेष चर्चेचा विषय असतो. पण सध्या ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ४१ लाखांचा हा लेहंगा दिल्ली एअरपोर्टवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआईएसएफ ने जप्त केला आहे.
हा लेहंगा साधारण हजार रूपयांचाच असेल पण याच्या बटणांमध्ये खरी किंमत लपलेली होती. सीआईएसएफ ने दिल्ली एअरपोर्टवर अशा व्यक्तीला पकडले जे लेहंग्यात लाखो रुपयांची विदेशी करंसी लपवून नेत होते.
सीआईएसएफच्या जवानांनी या व्यक्तीच्या लेहंग्यात लपवलेली विदेशी करंसी शोधून काढली. त्या व्यक्तीने हे लपवण्यासाठी फार मेहनत घेतली होती. त्याने हे अशा प्रकारे लपवले होते की, तिथून शोधून काढणे सहज शक्या नव्हते. त्याने लेहंग्याच्या बटनांमध्ये १ लाख ८५ हजार ५०० साऊदी रियाल म्हणजेच ४१ लाख रूपये लपवलेले होते. तपासादरम्यान आरोपीच्या बॅगमध्ये असलेल्या लेहंगा व त्यात लपवलेली करंसी जप्त केली गेली. तर आरोपीला कस्टम विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेचा व्हिडिओ स्वतः सीआईएसएफने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार आरोपीचे नाव मीसम रजा आहे. मीसम भारतीय नागरीक आहे. तो पैसे घेऊन दुबईला पळण्याच्या तयारीत होता.
असा पकडला आरोपी
सीआईएसएफच्या ड्यूटीवर असणाऱ्या जवानांना पहाटे ४ च्या सुमारास एका प्रवाशावर संशय आला. त्याची चौकशी केली गेली. त्यात तो सकाळी साडे सात च्या स्पाइस जेट विमानाने दुबईला जाणार असल्याचे त्याने सांगितले. संशयित म्हणून त्याची बॅग तपासण्यात आली. जेंव्हा जवानांनी लेहंगा नीट तपासला तेंव्हा त्यात १ लाख ८५ हजार ५०० साऊदी रियाल मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.