नवी दिल्ली- जी-२० संमेलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने जवळपास १६० डोमेस्टिक फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जी-२० संमेलन ८ संप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत असणार आहे. याकाळामध्ये दिल्लीमध्ये अनेक ट्रॅफिक निर्बंध असणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. (At least 160 flights cancelled at Delhi airport on Sept 8 10 in light of G20 Summit)
दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट एलटीडी Delhi International Airport Ltd (DIAL) इंदिरा गांधी विमानतळाचे कामकाज पाहते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अनेक एअरलाईन कंपन्यांकडून तीन दिवसांसाठी विमानतळावरुन निघणाऱ्या आणि विमानतळावर येणाऱ्या अशा एकूण १६० डोमेस्किट फ्लाईट रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा विचार करण्यात आला आहे.
डोमेस्टिक फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय विमानतळाच्या परिसरात पार्किंगची जागा कमी असल्याने घेण्यात आलेला नाही, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच याचा परिणाम आंतरराष्टीय विमानांच्या प्रवासावर पडणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. जी-२० च्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोतपरी तयारी करत आहोत. पार्किंग जागा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही याआधीच आवश्यक ती पार्किग पुरवली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
जी-२० संमेलनावेळी होणाऱ्या ट्रॅफिक निर्बंधाच्या संदर्भात फ्लाईट रद्द करण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या ८० आणि विमानतळावर उतरणाऱ्या ८० फ्लाईट रद्द करण्यात आलेत. फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं DIAL कडून सांगण्यात आलंय.माहितीनुसार, रद्द फ्लाईट एकूण ऑपरेशनच्या ६ टक्के आहेत.
जी-२० कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पार्किंग जागा पुरवण्यात आली आहे. तसेच परदेशी पाहुण्याच्या विमानासाठीही पार्किंग जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. फ्लाईट रद्द करण्याच्या अगोदर ही जागा देण्यात आली होती, असं DIAL कडून सांगण्यात आलंय. जी-२० संमेलनाच्या दरम्यान दिल्ली-एनसीआर भागात ट्रॅफिकमुळे लोकांचा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. तसेत संमेलनाच्या काळात दिल्लीला जाऊ इच्छिणाऱ्या किंवा दिल्लीतून येणाऱ्या प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचा कार्यक्रम आखावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.