Atal Setu Pul Crack : देशातला सर्वात लांब पूल असलेला अटल सेतू खास का आहे? जाणून घ्या

अटल सेतू बांधताना पर्यावरणाची विशेष काळजी घेण्यात आली
Atal Setu Pul Crack
Atal Setu Pul CrackESAKAL
Updated on

 Atal Setu Pul Crack :

देशातील सर्वात लांब सागरी सेतू 'अटल सेतू' (MTHL) मध्ये पावसाळ्याच्या पहिल्या पावसात तडे गेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पुलाला म्हणजेच अटल सेतूला भेट दिली. त्यांनी अटल सेतूवरील दरडांची पाहणी करून भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

यावर्षी 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अटल सेतूचे उद्घाटन केले होते. भाजपने लगेच प्रत्युत्तर दिले आणि म्हटले- 'काँग्रेस सतत खोटे बोलून आपला प्रचार देशभर पसरवत आहे.

Atal Setu Pul Crack
''अटल सेतू'' प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला नाहीच

काँग्रेस खोटे राजकारण करत असून खोट्याला काहीच अर्थ नसतो. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर खोट्या बातम्या पसरवत आहे.

अटल सेतूची लांबी किती आहे?

अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. पुलाचा थोडा भाग समुद्रावर तर थोडा भाग जमिनीवर आहे. ज्याची लांबी सुमारे 22 किलोमीटर आहे. यातील 16.5 किलोमीटर समुद्राच्या वर आहे आणि उर्वरित 5.5 किलोमीटर पूल जमिनीवर आहे.

Atal Setu Pul Crack
Sudarshan Setu: 'अटल सेतू'नंतर मोदींनी केलं देशातील सर्वात लांब केबल ब्रिजचं लोकार्पण; 'सुदर्शन सेतू'ची काय आहे खासियत?

अटल सेतू वास्तूकलेचा उत्तम नमुना

अटल सेतू वास्तूकलेचे अद्वितीय उदाहरण आहे. या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुलावर इमर्जन्सी एक्झिट रोड आणि व्हेंटिलेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे.

जे कोणत्याही प्रकारच्या अपघात अन् नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यास सक्षम करते. या पुलाची रचना दोन्ही बाजूने होणारी वाहतूक व्यवस्था हाताळण्यासाठी करण्यात आली आहे.

Atal Setu Pul Crack
Atal Setu: 'अटल सेतू'ला पडल्या मोठ्या भेगा; तीनच महिन्यांपूर्वी PM मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन

जानेवारीत झाले उद्घाटन

या पुलाचे अधिकृत नाव 'अटल बिहारी वाजपेयी सेवरी-न्हावा शेवा अटल सेतू' आहे. याचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हा पूल मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मैलाचा दगड ठरला. यामुळे हवामान किंवा वाहतूक कोंडीमुळे प्रवासात अडथळे आणणाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळाला.

अटल सेतूमुळे मौल्यवान वेळ वाचला

वेळ मौल्यवान असतो असे म्हणतात. कारण, वेळ विकत घेता येत नाही. मुंबईकरांचा हाच वेळ अटल सेतुमुळे वाचला आहे. कारण, अटल सेतू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्वरीत जोडतो. या पुलामुळे मुंबई ते दक्षिण भारत, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे.

यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर आणि मुंबई बंदरालाही जोडणे सहज शक्य झाले. अटल सेतू ही केवळ मुंबईची जीवनवाहिनी नसून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू बनली आहे. लोकांचा प्रवासाचा वेळ वाचत आहे.

Atal Setu Pul Crack
‘अटल मॅरेथॉन’मध्ये देशपातळीवर विश्वजीत परीटचा प्रोजेक्ट अव्वल

पर्यावरण पुरक अटल सेतू

अटल सेतू बांधताना पर्यावरणाची विशेष काळजी घेण्यात आली. त्याच्या बांधकामादरम्यान, सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचवणारे आवाज आणि कंपन कमी करण्यासाठी सर्व उपाय योजले गेले. या पुलाचा फायदा सर्वांनाच झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.