Atiq Ahmed Shot Dead Timeline : गँगस्टर अतिक अहमदचा खात्मा! जाणून घ्या कशा घडल्या घडामोडी

Atiq Ahmed Shot Dead Timeline
Atiq Ahmed Shot Dead Timeline
Updated on

Atiq Ahmed Shot Dead Timeline : प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन ते तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला. अतिकवर गोळ्या झाडणारे मीडियावाले म्हणून आले होते. पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केले.

माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजच्या नैनी मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आले होते. गुजरातमधील साबरमती तुरुंगातून अतिक अहमदला घेऊन प्रयागराज पोलिस आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) टीमने उत्तर प्रदेशात आणले होते. १७ वर्षीय उमेश पाल हत्या प्रकरणात त्याला २८ मार्च रोजी न्यायालयात हजर केले केले होते.

अतिक अहमद गुजरातच्या साबरमती तुरुंगात होता. २००४ मध्ये तत्कालीन बसपा आमदार राजू पाल यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यासोबतच राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल यांचे अपहरण करून या वर्षी त्यांची हत्या केल्याप्रकरणी माफिया अतिक आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

२४ फेब्रुवारी रोजी अतिकच्या सांगण्यावरून उमेश पाल यांची प्रयागराजमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात उमेश पाल आणि त्यांचे दोन्ही साथीदार मारले गेले होते. अतिकवर एवढ्या गंभीर गुन्ह्याचा हा पहिला आरोप नाही, याआधीही अनेक प्रकरणात त्याचे नाव आले आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी खुनाचा आरोप होता

अतीक अहमदची कथा १९७९ सालापासून सुरू होते. त्यावेळी फिरोज अहमद यांचे कुटुंब अलाहाबादच्या चकिया परिसरात राहत होते, ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टांगा चालवत असत. फिरोज यांचा मुलगा अतीक हा हायस्कूलमध्ये नापास झाला होता. यानंतर त्यांचे मन अभ्यासाकडे वळले. त्याला श्रीमंत होण्याचा मोह झाला. त्यामुळे तो चुकीच्या व्यवसायात उतरला आणि खंडणी वसूल करू लागला. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याच्यावर खुनाचा आरोप झाला होता. त्यावेळी जुन्या शहरात चांदबाबांचा काळ होता. पोलीस आणि नेते दोघांनाही चांद बाबाची भीती संपवायची होती. त्यामुळे अतिक अहमद यांना पोलिस आणि राजकारण्यांची साथ मिळाली. पण नंतर अतीक अहमद चांद बाबापेक्षाही धोकादायक ठरला.

अतिक अहमदचे नाव गेस्ट हाउस घोटाळ्यात

मायावतींवर हल्ला करणाऱ्या लखनऊमध्ये जून १९९५ मध्ये झालेल्या गेस्ट हाऊस घटनेतील मुख्य आरोपींपैकी अतिक अहमदचे नाव होते. मायावतींनी गेस्ट हाऊस घटनेतील अनेक आरोपींना माफ केले होते, पण अतिक अहमद यांना सोडले नाही. मायावती सत्तेत आल्यानंतर अतिक अहमदसाठी उलटी गिनती सुरू झाली, त्यामुळे जेव्हा-जेव्हा बसपा सत्तेवर आला तेव्हा अतीक नेहमीच त्यांच्या निशाण्यावर राहिला.

Atiq Ahmed Shot Dead Timeline
"वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते अन्...." ; अतिक -अशरफची हत्या की एन्काऊंटर? नेमकं काय घडल?

२००४ मध्ये अतीक खासदार झाला

अतिक अहमद यानी उत्तर प्रदेशच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. यापूर्वी अतिक अहमद अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र ते खासदार झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी पोटनिवडणूक जाहीर झाली. या जागेवर सपाने खासदार अतिक अहमद यांचे धाकटे बंधू अशरफ यांना उमेदवारी दिली. मात्र बहुजन समाज पक्षाने अश्रफ यांच्यासमोर राजू पाल यांना उमेदवारी दिली. पोटनिवडणूक झाली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आले, बसपाचे उमेदवार राजू पाल यांनी अतिक अहमद यांचा भाऊ अश्रफ यांचा पराभव केला होता.

२५ जानेवारी २००५ ला राजू पालची हत्या

पोटनिवडणुकीत अश्रफ यांचा पराभव झाल्याने अतिक अहमद यांच्या गटात खळबळ उडाली होती. पण हळूहळू प्रकरण शांत झाले. मात्र राजू पाल यांच्या विजयाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पहिल्यांदा आमदार झालेल्या राजू पाल यांची काही महिन्यांनी २५ जानेवारी २००५ रोजी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात देवी पाल आणि संदीप यादव नावाच्या दोघांचाही मृत्यू झाला होता. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

६ एप्रिल २००५

आमदार राजुपाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अतिक अहमद आणि त्यांच्या भावासह ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

१२ डिसेंबर २००८

त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी सुरूच होती. मात्र या प्रकरणाच्या तपासावर राजू पाल यांचे कुटुंबीय समाधानी नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.

१० जानेवारी २००९

सीआयडीने पाच आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

२२ जानेवारी २०१६

राजू पाल यांचे कुटुंबीयही सीबी-सीआयडीच्या तपासावर नाराज होते. निराश होऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

२० ऑगस्ट २०१९

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने राजू पाल हत्याकांडात नवा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जवळपास तीन वर्षांच्या तपासानंतर सीबीआयने सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

१ ऑक्टोबर २०२२

दिवंगत आमदार राजू पाल खून खटल्याची सुनावणी करताना विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश कविता मिश्रा यांनी सहा आरोपींवर आरोप निश्चित केले. या हत्याकांडात माजी आमदार अशरफ, माजी खासदार अतिक अहमद यांचा भाऊ यांच्यासह अन्य लोकांचा सहभाग होता. सर्व आरोपींविरुद्ध खून, हत्येचा कट आणि खुनाचा प्रयत्न असे आरोप निश्चित करण्यात आले. मात्र, न्यायालयासमोर आरोपींनी आरोप फेटाळून लावत खटला चालवण्याची मागणी केली होती.

२४ फेब्रुवारी २०२३

या हल्ल्यात ठार झालेला उमेश पाल हा प्रयागराजच्या राजुपाल हत्याकांडाचा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्याच्या साक्षीवरूनच अतिक अहमदसह सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. उमेश पाल यांना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. मात्र शुक्रवारी प्रयागराजच्या धुमनगंज भागात उमेश पाल यांच्यावर पूर्ण तयारीनिशी हल्ला करून हत्या करण्यात आली होती.

१३ एप्रिल २०२३

१३ एप्रिल रोजी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असद अहमद आणि गुलाम अहमद यांना यूपी एसटीएफने झाशी येथे चकमकीत ठार मारले होते. असद हा अतिक अहमद यांचा मुलगा होता.

१५ एप्रिल २०२३

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुरुंगात असलेल्या दोन्ही भावांना प्रयागराज येथील केल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले जात असताना ही हत्या झाली.आमदार राजू पाल यांची भरदिवसा हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. सपा खासदार अतिक अहमद यांच्यावर बसपाने हल्लाबोल केला होता. त्याचवेळी दिवंगत आमदार राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांनी धुमनगंज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

मुख्य साक्षीदार उमेश पाल होता

उमेश पाल हा या हायप्रोफाईल खून खटल्यातील महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना उमेश पाल यांना धमक्या मिळू लागल्या. आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून त्यांनी पोलीस आणि न्यायालयाकडे संरक्षणाची विनंती केली होती. यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार उमेश पाल याला यूपी पोलिसांनी सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक दिले होते.

Atiq Ahmed Shot Dead Timeline
Atiq Ahmed shot dead : मोठी बातमी! मुलगा असदनंतर गँगस्टर अतिक अहमद अन् भाऊ अश्रफचाही गोळीबारात मृत्यू

६ एप्रिल २००५

आमदार राजुपाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अतिक अहमद आणि त्यांच्या भावासह ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

१२ डिसेंबर २००८

त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी सुरूच होती. मात्र या प्रकरणाच्या तपासावर राजू पाल यांचे कुटुंबीय समाधानी नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.

१० जानेवारी २००९

सीआयडीने पाच आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

२२ जानेवारी २०१६

राजू पाल यांचे कुटुंबीयही सीबी-सीआयडीच्या तपासावर नाराज होते. निराश होऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

२० ऑगस्ट २०१९

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने राजू पाल हत्याकांडात नवा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जवळपास तीन वर्षांच्या तपासानंतर सीबीआयने सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

१ ऑक्टोबर २०२२

दिवंगत आमदार राजू पाल खून खटल्याची सुनावणी करताना विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश कविता मिश्रा यांनी सहा आरोपींवर आरोप निश्चित केले. या हत्याकांडात माजी आमदार अशरफ, माजी खासदार अतिक अहमद यांचा भाऊ यांच्यासह अन्य लोकांचा सहभाग होता. सर्व आरोपींविरुद्ध खून, हत्येचा कट आणि खुनाचा प्रयत्न असे आरोप निश्चित करण्यात आले. मात्र, न्यायालयासमोर आरोपींनी आरोप फेटाळून लावत खटला चालवण्याची मागणी केली होती.

२४ फेब्रुवारी २०२३

या हल्ल्यात ठार झालेला उमेश पाल हा प्रयागराजच्या राजुपाल हत्याकांडाचा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्याच्या साक्षीवरूनच अतिक अहमदसह सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. उमेश पाल यांना यापूर्वीही धमक्या आल्या होत्या. मात्र शुक्रवारी प्रयागराजच्या धुमनगंज भागात उमेश पाल यांच्यावर पूर्ण तयारीनिशी हल्ला करून हत्या करण्यात आली होती.

१३ एप्रिल २०२३

१३ एप्रिल रोजी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असद अहमद आणि गुलाम अहमद यांना यूपी एसटीएफने झाशी येथे चकमकीत ठार मारले होते. असद हा अतिक अहमद यांचा मुलगा होता.

१५ एप्रिल २०२३

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तुरुंगात असलेल्या दोन्ही भावांना प्रयागराज येथील केल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले जात असताना ही हत्या झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.