Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास

Delhi New CM News : विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना मंत्रिमंडळात काही फार बदल होण्याची शक्यता नव्हती.
Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास
Updated on

Latest New Delhi News: दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना उद्या, शनिवारला शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर पाच मंत्रीसुद्धा शपथ घेणार असून जुन्या निष्ठावंत मंत्र्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘आप’च्या विधिमंडळ पक्षाने आतिशी सिंह मार्लेना यांची नेता म्हणून निवड केली. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना शनिवारी शपथ घेण्यासाठी पाचारण केले. ७० सदस्यीय विधानसभेत ‘आप’चे ६२ आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना मंत्रिमंडळात काही फार बदल होण्याची शक्यता नव्हती.

Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास
Atishi Marlena Saree Collection: ऑफिसमध्ये हवाय क्लासी अन् फॉर्मल लूक, 'आतिशी' यांच्या साड्यांना द्याल पहिली पसंती

दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह सात मंत्र्यांचे मंत्रिमंडळ राहू शकते. परंतु मुख्यमंत्र्यांसह केवळ ६ जणांना शपथ दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिपदाचे एक पद रिक्त ठेवण्यात येणार आहे. या पदावर कुणाची नियुक्ती करावयाची याबद्दल काही दिवसांनी निर्णय घेण्यात येणार आहे. आतिशी यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसैन, कैलास गहलोत या माजी मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.

Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास
Atishi Marlena: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांचं नाव जाहीर होताच स्वाती मालिवाल भडकल्या; म्हणाल्या, डमी...

तसेच यावेळी मुकेश अहलावत यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. अहलावत सुलतानपूर माजरा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यापूर्वी दलित समाजाचे राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्याने मंत्रिपद रिक्त होते. एक मंत्रिपद मात्र रिक्त ठेवण्यात आले आहे. यावर अद्यापही एकही मंत्री शपथ घेणार नाही.

Atishi Marlena: आतिशी यांचा आज शपथविधी, जुन्या निष्ठावंत मंत्र्यांवर पुन्हा विश्वास
Atishi Marlena : हरियाना सरकारने पाणी रोखले,आप;आतिशी यांचे उपोषण सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.