नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपच्या आमदार आतिशी मार्लेना यांचं नाव घोषीत झालं आहे. खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ठेवला होता. पण आता आतिशी यांच्या नावावरुन दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल भडकल्या आहेत. त्यांनी ट्विट करत या घोषणेला विरोध केला आहे.