Atishi Oath Ceremony: ठरलं! अतिशी या दिवशी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; इतर नेतेही घेणार मंत्रि‍पदाची शपथ

Atishi will take oath as CM:अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून २१ सप्टेंबर रोजी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर नेते देखील मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.
Atishi
Atishi
Updated on

नवी दिल्ली- अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून २१ सप्टेंबर रोजी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर नेते देखील मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. आम आदमी पक्षाकडून यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या काळापर्यंतच अतिशी या मुख्यमंत्रीपदावर असतील.

अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मद्य घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याची निवड लवकरच करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांची विधिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशी यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.