ATM मधून पैसे निघत नाहीत परंतु खात्यातून पैसे कट होतात? इथे करा तक्रार

पैसे कापल्याचा मेसेज येतो पण एटीएममधून पैसे निघत नाहीत
ATM
ATM esakal
Updated on

एटीएम (Automated teller machine) आपले जीवन सुकर करतात यात शंका नाही. काही मिनिटांतच आणि कुठेही एटीएममधून सहज पैसे काढले जातात, पण, काहीवेळा हे एटीएम आपल्याला अडचणीत आणतात. अनेक वेळा असे घडते की एटीएममधून पैसे काढताना तुमच्या खात्यातून पैसे निघत नाहीत परंतु पैसे कापले जातात. पैसे कापल्याचा मेसेज येतो पण एटीएममधून पैसे काढले जात नाहीत. अशा परिस्थितीत या समस्येची तक्रार कुठे करायची आणि ती कशी सोडवायची हेच समजत नसल्याने ग्राहक घाबरतात. एटीएममधून पैसे काढले जात नाहीत परंतु खात्यातून पैसे कापले जातात, मग तुम्ही लगेच काय करावे ते जाणून घ्या. (Automated teller machine)

5 दिवसात पैसे केले जातील परत

एटीएममधून पैसे न काढता तुमच्या खात्यातून पैसे कापले जात असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. काहीवेळा तांत्रिक समस्यांमुळे असे घडते. हे पैसे परत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सर्व बँकांना 5 कामकाजाच्या दिवसांच्या आत डेबिट केलेले रुपये जमा करावे लागतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास दररोज 100 रुपये दंड बँकेला भरण्याचा नियम करण्यात आला आहे.

या गोष्टी ठेवा लक्षात

1) रोख पैसे काढण्याच्या वेळी, एटीएममध्ये व्यवहार पूर्ण न झाल्यास त्वरित पैसे काढण्याची सूचना तपासा.

2) तुम्ही तुमच्या बँकेत जमा केलेल्या रकमेची माहिती ताबडतोब मिळवा आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत की नाही याची खात्री करा.

3) एटीएममधून पैसे न काढता खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर तुम्ही ५ दिवस वाट पाहावी. बहुतेक असे दिसून येते की पाच दिवसांत पैसे खात्यात परत केले जातात.

4) पाच दिवस उलटूनही खात्यात पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही व्यवहार अयशस्वी झाल्याबद्दल बँकेच्या शाखेकडे तक्रार करू शकता.

5) बँकेत तक्रार केल्यानंतर ३० दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही तक्रार निवारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता.

ATM
'मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील एटीएम च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर'

येथे करा ऑनलाइन तक्रार

जर आपण स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल बोललो तर, जर आरबीआयने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही पैसे परत केले नाहीत, तर तुम्ही ग्राहक केंद्र अंतर्गत https://crcf.sbi.co.in/ccf/ under Existing Customer //ATM related//ATM related//Account Debited but cash not dispensed या वेबसाईट वर तक्रार करू शकता.

याशिवाय SBI हेल्पलाइन क्रमांक 1800 11 2211 (टोल-फ्री), 1800 425 3800 (टोल-फ्री) वर कॉल करून तक्रार दाखल करू शकता.

यासोबतच सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत 080-26599990 या क्रमांकावर कॉल करूनही तक्रार दाखल करू शकता.

ATM
आता कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार; RBIचा नवा नियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.