मोठा खुलासा! PFI चे सदस्य पाकिस्तानच्या संपर्कात; फोनमध्ये सापडले 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर

पोलिसांनी पीएफआयवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केलीय.
ATS Raid on Bhopal Office PFI
ATS Raid on Bhopal Office PFIesakal
Updated on
Summary

पोलिसांनी पीएफआयवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केलीय.

भोपाळ : मध्य प्रदेश पोलिसांनी (Madhya Pradesh Police) पीएफआयवर (PFI) कडक कारवाई करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता पीएफआयचं पाकिस्तान कनेक्शनही (Pakistan Connection) समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर आढळले आहेत.

अनेकवेळा हे आरोपी पाकिस्तानात गेले आहेत, त्यामुळं पोलीस आता टेरर फंडिंगचे पुरावे गोळा करत आहेत. अलीकडंच पीएफआयचे अब्दुल करीम (राज्याध्यक्ष), मोहम्मद जावेद (राज्य कोषाध्यक्ष), जमील शेख (राज्य सचिव) आणि अब्दुल खालिद (महासचिव) यांना अटक करण्यात आली. एटीएस सर्व आरोपींची चौकशी करत आहे. न्यायालयानं आरोपींना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.

ATS Raid on Bhopal Office PFI
PFI वर पुन्हा मोठी कारवाई; 8 राज्यांत 200 ठिकाणी छापे, 170 जण ताब्यात

तपास यंत्रणा मोहम्मद मेहमूदच्या शोधात

आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं तपासली असता त्यांचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल खालिदच्या मोबाईल फोननं अनेक गुपितं उघड केली आहेत. खालिदच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. त्याचा भाऊ मोहम्मद महमूदही 6 वेळा पाकिस्तानला गेला आहे. तपास यंत्रणा मोहम्मद मेहमूदचा शोध घेत आहे.

ATS Raid on Bhopal Office PFI
देशभरात RSS ची पाच नवीन विद्यापीठे उघडणार; शिक्षणात बदल घडवण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.