केजरीवालांच्या घरावर भाजपने केला हल्ला; सिसोदीयांनी दिली माहिती

BJP Attack on Kejriwal House
BJP Attack on Kejriwal Housee sakal
Updated on

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काही अराजकतावादी लोकांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. त्या ठिकाणी CCTV कॅमेरा आणि सिक्योरिटी बॅरियरची तोडफोड केली आहे. याशिवाय गेटवरील बूम बॅरियर देखील तोडले आहेत. शिवाय त्यांच्या घराला भगवा रंग देखील फासण्यात आला आहे.

नेमकं काय घडलंय?

अरविंद केजरीवाल यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन मांडलेली मते यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणी आता भाजप नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटलंय की, त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती, म्हणून त्यांनी हे आंदोलन केलंय. या कृत्यावर आता आपच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मनीष सिसोदिया यांनी आरोप केलाय की, भाजपच्या गुंडांना अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली आहे. इतकचं नव्हे तर त्यांनी पुढे म्हटलंय की, भाजपचे पोलिस त्यांना अडवण्याऐवजी त्यांना दरवाजापर्यंत घेऊनच आली आहे.

50 कार्यकर्ते ताब्यात

दिल्ली उत्तरचे डिसीपी यांनी सांगितलंय की, भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरु होते. यामध्ये आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवर देखील हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराबाबेर भगवा रंग देखील फेकला आहे. आम्ही 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या जमावाला पांगवण्यात आलं आहे. आता परिसरात पूर्णपणे शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()