एक रुपया..मिठाची पुडी देऊन 1954 मध्ये बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न; अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Amit Shah allegations against Congress: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भंडारा-गोदिंयामध्ये सभा घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
एक रुपया..मिठाची पुडी देऊन 1954 मध्ये बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न; अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
Updated on

भंडारा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भंडारा-गोदिंयामध्ये सभा घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांना १९५४ च्या पोटनिवडणुकीत हरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.(An attempt to defeat Babasaheb ambedkar in 1954 election Amit Shah serious allegations against Congress)

महाराष्ट्राच्या पावन भूमीत वीर छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. याच भूमीमध्ये डॉ. बाबासाहेबांचा जन्म झाला आहे. बाबासाहेबांनी संविधान बनवून सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलंय. बाबासाहेबांनी जगातील सर्वाधिक समावेशक असे न्यायप्रिय आणि सर्वांना समानतेचा हक्क देणारे संविधान दिले आहे. बाबासाहेबांच्या चरणांना मी प्रणाम करतो, असं अमित शहा म्हणाले.

एक रुपया..मिठाची पुडी देऊन 1954 मध्ये बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न; अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
Jalgaon Lok Sabha Election : भाजप पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; भाजपचा एक गट प्रचारापासून अलिप्त

बाबासाहेबांची आज जयंती आहे, त्यामुळे मी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेऊन मत मागण्यासाठी घरोघरी फिरत आहे. पण. १९५४ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत याच काँग्रेसने बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. १९५२, १९५४ मध्ये जोर लावून बाबासाहेबांना हरवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे, असं शहा म्हणाले.

मतदारांना एक रुपया आणि मिठाची पुडी देऊन बाबासाहेबांना हरवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. पाच दशकं शासन करुन देखील बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आलं नाही, उलट त्यांचा अपमान करण्यात आला. बाबासाहेबांशी संबंधित जुडलेल्या पाचही तीर्थस्थानांना सन्मानित करुन बाबासाहेबांना युगोंयुगे अमर करण्याचं काम भाजपने केलं आहे, असं ते म्हणाले.

एक रुपया..मिठाची पुडी देऊन 1954 मध्ये बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न; अमित शहांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
Nashik Lok Sabha Constituency : नीतेश राणे यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले; भाजप पदाधिकारी, संघ परिवारात आश्चर्य

बाबासाहेब नसताना खोटं बोलून त्यांच्या स्पिरिटला जमिनीत गाडण्याचं काम काँग्रेस करत आहे. काँग्रेस खोटं बोलत आहे. भाजपला ४०० जागा मिळाल्यास संविधान संपेल असा भ्रम पसरवला जात आहे. आमच्याकडे दोन टर्म बहुमत आहे, पण आमच्या बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटवण्यासाठी केला नाही, असं शाह म्हणाले.

बहुमताचा उपयोग आम्ही कलम ३७० हटवण्यासाठी केला आहे. बहुमताचा उपयोग ट्रिपल तलाक हटवण्यासाठी केला आहे. राहुल गांधी लोकांमध्ये भ्रम पसरवत आहेत. जोपर्यंत भाजप राजकारणात आहे तोपर्यंत आम्ही आरक्षण हटवणार नाही ही नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे, असं अमित शहा म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.