Mulayam Singh Yadav: कारसेवकांवर गोळ्या झाडणारे...मुलायम सिंह यांच्या निधनावर भाजपचे वादग्रस्त ट्विट

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे.
atul bhatkhalkar controversial tweet mulayam singh yadav death
atul bhatkhalkar controversial tweet mulayam singh yadav death esakal
Updated on

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. मुलायम सिंह यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहेत. दरम्यान, राजकीय विरोधक असणारे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे. (atul bhatkhalkar controversial tweet mulayam singh yadav death )

मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्वीट केलंय. कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो, असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Sakal

गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते 'नेताजी' या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे वादग्रस्त ट्विटचा किस्सा?

1989 मध्ये लोकदलाचे प्रमुख मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला देशभरात मंडल-कमंडलाची लढाई सुरू झाली. अशा परिस्थितीत 1991 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कारसेवा केली.

कारसेवक वादग्रस्त इमारतीच्या जवळ पोहोचल्यानंतर मुलायमसिंह यांनी सुरक्षा दलांना गोळीबार करण्याची सूचना केली. सुरक्षा दलाच्या या कारवाईत 16 कारसेवक शहीद झाले. तर शेकडो जखमी झाले. त्यानंतर मुलायम यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या कारवाईत 28 लोक मारले गेले.

कारसेवकांवर गोळीबार केल्यानंतर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसची घोषणा होण्यापूर्वीच मुलायमसिंह यादव यांनी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली.

यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि मुलायमसिंह यांचा पक्ष सत्तेबाहेर झाला. 419 जागांवर झालेल्या निवडणुकीत मुलायम यांच्या पक्षाला केवळ 92 जागा मिळू शकल्या. भाजपने 221 जागा जिंकून सरकार स्थापन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.