Aurangzeb Love Story: दासीच्या प्रेमाखातर औरंगजेब दारूचा घोट घ्यायला निघाला होता

बुरहानपूरमध्ये औरंगजेबाला त्याचं प्रेम सापडलं होतं. त्याच्या या प्रेमाचा किस्सा 'मसर-अल-उमराह' या पुस्तकात देण्यात आला आहे.
Aurangzeb
AurangzebSakal
Updated on

Love Story of Aurangzeb: तेव्हा हिंदुस्थानात मुघल सम्राट शाहजहानचं राज्य होतं. शाहजहान मुघल सम्राट बनल्यावर त्याचा मुलगा औरंगजेब साधारण पस्तिशीला पोहोचला असेल. याच काळात शहाजहानने त्याला दख्खनचा सुभेदार बनवलं. औरंगाबादला जाताना वाटेत बुरहानपूर लागतं. याच बुरहानपूरमध्ये औरंगजेबाला त्याचं प्रेम सापडलं. आणि ज्याचे किस्से चवीचवीने सगळीकडे सांगितले जाऊ लागले. याच संबंधीचा एक किस्सा 'मसर-अल-उमराह' या पुस्तकात लिहिलाय.

त्याचं झालं असं होतं की, औरंगजेबाची मावशी बुरहानपुर मध्ये राहायची. औरंगाबादला जाताना वाटेत मुक्काम करावा म्हणून औरंगजेब बुरहानपुर मध्ये थांबला.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

त्याच संध्याकाळी औरंगजेब बुरहानपूरच्या जैनाबादच्या बाग आहू खानामध्ये फिरायला गेला. त्याच बागेत त्याची मावशी तिच्या दासींसोबत फिरत होती. त्यात एक 'जैनाबादी' नावाची खूपच सुंदर दासी होती. तिचा गळा ही इतका गोड होता की, औरंगजेब तो आवाज ऐकताच त्या आवाजाच्या प्रेमात पडला.

बागेतल्या आंब्याच्या झाडाला काही आंबे लगडले होते. तिथूनच जाताना जैनाबादीने हलकीशी उडी मारून आंबा तोडायचा प्रयत्न केला. तिला ना राजपुत्राची पर्वा होती ना मावशीची.

सुहेला बानोला जैनाबादीचं हे वागणं काही आवडलं नाही. दुसरीकडे, राजकुमार तिच्याकडे पाहत असल्याचं दुसऱ्या दासीला दिसलं. राजकुमार इथेच त्या दासीच्या प्रेमात पडला. त्या दासीचे खरं नाव हिराबाई असं होतं.

हेही वाचा: Sharad Pawar News : शरद पवारांनी कर्नाटकप्रश्नी मार खाल्ल्याचे पुरावे द्या!; निलेश राणेंची मागणी

… आणि तिला पाहताच राजकुमार बेशुद्ध पडला

राजकुमार हिराबाईचं सौंदर्य न्याहाळत बसला होता. हिराबाई झाडाखाली फांदी धरून मंद आवाजात गुणगुणत असताना सुध्दा राजपुत्राने ऐकलं होतं. औरंगजेबाचे चरित्र लिहिणाऱ्या हमीदुद्दीन खान यांनी आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलाय. त्यांनी लिहिलंय की, दासी हिराबाईला पाहून राजपुत्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो तिथंच बेशुद्ध पडला.

राजकुमाराला पाहून त्याची मावशी पळत आली. शुद्धीवर आल्यावर औरंगजेब आपल्या मावशीला म्हणाला, त्याच्यासोबत असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. माझ्या रोगावरचा इलाज फक्त तुझ्याकडे आहे. यावर मावशी म्हणाली, मी तुझ्यासाठी माझा प्राणही त्यागू शकते. शेवटी राजकुमाराने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला.

त्यावर त्याची मावशी म्हणाली, मी तुझ्यासाठी स्वतःचा त्याग करू शकते, पण तू माझ्या नवऱ्याला ओळखत नाहीस. तो एक क्रूर माणूस आहे. हिराबाईशी तुझे संबंध ऐकून तो आधी तिला आणि नंतर मला मारून टाकेल. यातून मार्ग काढण्यासाठी राजपुत्राने त्याचा विश्वासू मुर्शिद कुली खान यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा: Krantisinh Nana Patil : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मुखातून संसदेत पहिल्यांदा मराठी गर्जली!

शेवटी हिराबाई मिळालीच!

बरेच इतिहासकार या घटनांशी असहमत आहेत. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते, 'औरंगजेबाचं एकमेव प्रेम 'हिराबाई' होतं. ती काश्मिरी हिंदू होती आणि तिला तिच्या आई वडिलांनी बाजारात विकलं होतं. खान-ए-जमानच्या दरबारात ती नाच- गाणं करायची.

औरंगजेबाने आपल्या मावशीची विनवणी करून हिराबाई मिळवल्याचा उल्लेख मसर-अल-उमरामध्ये करण्यात आलाय. त्याच वेळी, 'एहकाम-ए-आलमगिरी' नुसार, औरंगजेबाने हिराबाईची मागणी केल्यावर त्याच्या मावशीच्या नवऱ्याने त्याच्याकडे चित्राबाईची मागणी केली. अशी देवाणघेवाण झाली.

मुघल सम्राट अकबराच्या काळापासून राजघराण्यातील हरममध्ये ज्या महिला असतात त्यांची नाव जाहीर न करण्याची पद्धत होती. त्यांचा भूतकाळात कोणालाही कळू नये म्हणून त्यांना त्यांच्या ठिकाणांवरून नावं दिली जायची. जदुनाथ सरकारांच्या म्हणण्यानुसार हिराबाईचं नाव नंतर 'जैनाबादी' असं करण्यात आलं.

औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता. औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनंच रोखलं. या हिराबाईचं एका वर्षातच निधन झालं आणि ही प्रेम कहाणी संपली. हिराबाईचं दफन औरंगाबादमध्येच झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.