Gyanvapi Case : "औरंगजेब क्रूर नव्हता, त्याने विश्वेश्वर मंदिर पाडले नाही"

Aurangzeb was not cruel and he did not demolish  Adi Vishweshwar Temple in Varanasi says Gyanvapi Mosque Committee
Aurangzeb was not cruel and he did not demolish Adi Vishweshwar Temple in Varanasi says Gyanvapi Mosque Committee
Updated on

ज्ञानवापी मशीद वादावर वाराणसी कोर्टात सुनावणीदरम्यान ज्ञानवापी मशिद कमिटीने न्यायालयात मुघल सम्राट औरंगजेब आणि आदि विश्वेश्वर मंदिराबाबत मोठा दावा केला आहे. या मशीद परिसराच्या ASI सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या हिंदू उपासकांच्या याचिकेला विरोध करताना औरंगजेब क्रूर नव्हता तसेच त्याने कोणतेही विश्वेश्वर मंदिर पाडले नसल्याचे म्हटले आहे. (gyanvapi case varanasi court)

वाराणसी कोर्टमध्ये ज्ञानवापी मशिद समितीने "मुघल सम्राट औरंगजेब क्रूर नव्हता किंवा त्याने वाराणसीतील कोणतेही आदि विश्वेश्वर मंदिर पाडले नाही" असा दावा केला आहे.

तसेच ज्ञानवापी मशिदीच्या आवारात गेल्या वर्षी न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिशनर यांना 'शिव लिंग' सापडले असल्याचे देखील मशिदी कमिटीने नाकारले आहे . येथे सापडलेली वस्तू ही कारंजे/फौवरा आहे असे कमिटीने कोर्टात सांगितले आहे. लाइव्ह लॉने याबाबत वृत्त दिलं आहे.

Aurangzeb was not cruel and he did not demolish  Adi Vishweshwar Temple in Varanasi says Gyanvapi Mosque Committee
Amit Shah On Sengol : अमित शाह म्हणतात, नेहरूंची ती परंपरा पुन्हा सुरू करणार! सांगितला 'राजदंड' स्वीकारण्याचा किस्सा

काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल देत ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) यांना मशीद परिसरात आढळलेल्या 'शिवलिंग'ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी कोणतेही नुकसान होऊ नये, अशी सुचना न्यायलयाने केली आहे.

Aurangzeb was not cruel and he did not demolish  Adi Vishweshwar Temple in Varanasi says Gyanvapi Mosque Committee
Narendra Modi : लोकसभा निवडणूकीत मोदींना हा नेता देऊ शकतो टक्कर! ताज्या सर्व्हेत नाव आलं पुढं

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी आणि वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी दाखल केलेली याचिका मान्य केली आहे. यावेळी शिवलिंगाला इजा न करता त्याची कार्बन डेटिंग चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने एएसआयला दिले आहेत. वाराणसीतील न्यायालयाने कार्बन डेटिंग चाचणी घेण्यास नकार दिला होता. या आदेशाला याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी लक्ष्मी देवी आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.