Australian Universities Ban : ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी घातली भारताच्या 5 राज्यातील विद्यार्थी प्रवेशावर बंदी

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत आता आणखीन भर पडणार
Australian Universities Ban
Australian Universities Banesakal
Updated on

Australian Universities Ban : ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत आता आणखीन भर पडणार आहे. ऑस्ट्रेलियातील दोन विद्यापीठांनी भारतातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. भारतातील उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा व्यतिरिक्त, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमधील विद्यार्थ्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

Australian Universities Ban
Parliment Budget Session 2023: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर! कधीपासून सुरु? किती दिवस चालणार?

व्हिसा फसवणुकीची वाढती प्रकरणे पाहता, बंदी घातलेल्या दोन ऑस्ट्रेलियन विद्यापीठांपैकी एक आहे व्हिक्टोरिया येथील फेडरेशन विद्यापीठ. त्याचवेळी, बंदी घातलेल्या दुसऱ्या विद्यापीठाचं नाव आहे वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, जे न्यू साउथ वेल्समध्ये आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने ही बातमी दिली आहे.

Australian Universities Ban
Parliment Winter Session: लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब; आठवडाभर आधीच गुंडाळ्याची चर्चा

व्हिसा अर्ज फसवणूक

ऑस्ट्रेलियाच्या गृहविभागाच्या अहवालात व्हिसा घोटाळ्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार, भारतातून येणाऱ्या प्रत्येक चार विद्यार्थी व्हिसा अर्जांपैकी एक व्हिसा अर्ज फसवणूक करणारा आहे. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी आणि फेडरेशन युनिव्हर्सिटीने शिक्षण प्रतिनिधींना पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील विद्यार्थ्यांच्या नावांचा विचार करू नये असे निर्देश दिले आहेत.

पीएम मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंदीची घोषणा

विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दोन्ही विद्यापीठांनी बंदीची घोषणा केली होती. सिडनीमध्ये भारतीय प्रवाशांसाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 19 मे रोजी जारी केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे निरीक्षण आहे की गृहविभाग भारतीय प्रदेशातून येणारे व्हिसा नाकारत आहे आणि ही वाढ उल्लेखनीय आहे.

Australian Universities Ban
New Parliament Row : एक इमारत, वाद अनेक ! नवं संसद भवन तयार होत असताना नवे वादही निर्माण

दुसरीकडे, वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीने आपल्या पत्रात एजंटांना सांगितले की, 2022 मध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, परंतु त्यांनी अभ्यास अर्धवट सोडला. हे करणारे बहुतांश भारतीय विद्यार्थी पंजाब, गुजरात आणि हरियाणातील होते. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने भारतातील या राज्यांमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Australian Universities Ban
Nashik News: टाकी बांधून लाखो रुपयांचा चुराडा; 12 वर्षांपासून वापराविना पाण्याची टाकी

इतर अनेक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनीही काही राज्यांतील भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. एडिथ कॉवेन युनिव्हर्सिटी, टोरन्स आणि सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी यामध्ये प्रमुख आहेत.

Australian Universities Ban
New Parliament Building : आता PM मोदी आणणार ७५ रुपयांचं नाणं! वापरली जाणार ५० टक्के चांदी

विद्यार्थी व्हिसा फसवणूक कशी करतात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील यूपी, पंजाब, गुजरातसह अनेक राज्यांतील भारतीय नागरिक स्टुडंट व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियाच्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी येतात, पण मध्येच अभ्यास सोडून ते कामाला लागतात. त्यामुळे गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे त्या भारतीय विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होईल ज्यांना खरोखर अभ्यास करण्यासाठी येथील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.

Australian Universities Ban
Alia Bhatt: आलिया भट्ट लावते मुलतानी मातीचा फेस पॅक, हे आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य

ऑस्ट्रेलियात प्रकरणे का वाढत आहेत?

सिडनी हेराल्डच्या अहवालानुसार, 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देशात काम करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले होते. यामध्ये त्यांच्या कामावर असलेली मर्यादा हटवण्यात आली. तेव्हापासून विद्यार्थी व्हिसाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, आता सध्याचे अल्बेनीज सरकार हे धोरण पुन्हा बदलण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.