डेहराडून : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली असून यामध्ये २० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. द्रोपदी डंडा 2 पर्वत शिखरावर ही दुर्घटना घडली असून अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिम राबवली जात आहे. (Avalanche in Uttarakhand fears 20 trapped Rescue operation started)
या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करुन माहिती दिली. तसेच बचाव मोहिमेबाबत माहिती देताना म्हटलं की, हिमस्खलनात अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांकडून वेगानं दिलासा आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तसेच भारतीय हवाई दलानं दिलासा आणि बाचाव कार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी एएनआयला सांगितलं की, द्रोपदी डांडा 2 या पर्वत शिखरावर हिमस्खलन झालं असून यामध्ये नेहरू माऊंटनेरिंग (NIM) संस्थेचे २८ प्रशिक्षणार्थी अडकले होते. यांपैकी ८ जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही हिमस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच द्रोपदी डंडा 2 शिखरावर अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी एसडीआरएफच्या टीमला रवाना करण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.