एका ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराने दावा केला आहे की, भारत सरकारने तिच्या वर्क व्हिसाची मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे तिला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान कव्हर करता आले नाही. तसेच तिला भारत सोडण्यासही भाग पाडण्यात आले.
आता केंद्र सरकारच्या सूत्रांनी हा आरोप नाकारात, तो दिशाभूल करणारी आणि खोडकर असल्याचे म्हटले आहे.
महिला पत्रकाराने व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचे सूत्रांनी सांगितले, तरीही तिला निवडणूक कव्हर करता यावी म्हणून तिचा व्हिसा वाढविला जाईल असे आश्वासन देण्यात आले. अवनी डायस असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. ती एबीसी न्यूजशी संबंधित आहे. (Avani Dias Allegations On Modi Sarkar)
दरम्यान अवनी डायसने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गेल्या आठवड्यात मला अचानक भारत सोडावा लागला. मोदी सरकारने मला सांगितले की माझ्या व्हिसाला मुदतवाढ मिळणार नाही. कारण माझ्या रिपोर्टिंगने मर्यादा ओलांडली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या हस्तक्षेपानंतर, माझ्या फ्लाइटच्या 24 आधी मला फक्त दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली."
"भारतीय मंत्रालयाच्या निर्देशामुळे माझ निवडणूकीचे वार्तांकन अधिकृतपणे करता येणार नाही, असेही आम्हाला सांगण्यात आले. मोदी ज्याला "लोकशाहीची जननी" म्हणतात अशा राष्ट्रीय निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या दिवशी आम्ही परत निघालो," असे अवनी आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन पत्रकार अवनी डायसला निवडणूक कव्हर करण्याची परवानगी नव्हती. आणि तिला भारत सोडण्यास भाग पाडले गेल्याचा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
डायासने व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले, असे पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे.
सूत्रांनी सांगितले की, अवनी डायसच्या व्हिसाची मुदत 20 एप्रिल रोजी संपली होती. तिने 18 एप्रिलपर्यंतच व्हिसाची फी भरली होती. पण नंतर तिच्या व्हिसाचा कालावधी त्याच दिवशी जून अखेरपर्यंत वाढवण्यात आला.
सूत्रांचे म्हणणे आहे की, अवनी डायसने २ एप्रिल रोजी भारत सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिने भारत सोडला त्यावेळी तिचा व्हिसा वैध होता आणि त्याच्या व्हिसाची मुदतवाढ मंजूर झाली होती. निवडणूक कव्हर करण्यास परवानगी न दिल्याचा त्यांचा दावाही पूर्णपणे चुकीचा आहे.
सर्व व्हिसाधारकांना मतदान केंद्राबाहेर निवडणुका कव्हर करण्याची परवानगी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांवर अहवाल देण्यासाठी अधिकृतता पत्र आवश्यक आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की ACB चे इतर वार्ताहर मेघना बाली आणि सोम पाटीदार यांना निवडणूक कव्हरेज संदर्भात आधीच पत्र मिळाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.