Air India: एव्हिएशन रेग्युलेटर  DGCA ने एअर इंडियाला ठोठावला 80 लाखांचा दंड, जाणून घ्या कारण...

विमान वाहतूक नियामक DGCA ने एअर इंडियाला फ्लाईट ड्युटी वेळेच्या निर्बंधांशी संबंधित मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Air India news
Air India newsesakal
Updated on

Air India:

नवी दिल्ली: विमान वाहतूक नियामक DGCA (Directorate General of Civil Aviation) ने एअर इंडियाला फ्लाईट ड्युटी वेळेच्या निर्बंधांशी संबंधित मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. फ्लाईट सेवेचा कालावधी मर्यादित करणे आणि क्रूसाठी थकवा व्यवस्थापन प्रणालीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हे दंड आकारण्यात आले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जानेवारीमध्ये एअर इंडियाचे ऑन-द-स्पॉट ऑडिट केले होते. या कालावधीत जमा झालेल्या पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जानेवारीमध्ये एअर इंडियाचे ऑन-साइट ऑडिट केले होते. या कालावधीत जमा झालेल्या पुराव्यांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. DGCA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “अहवाल आणि पुराव्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की काही प्रकरणांमध्ये एअर इंडिया लिमिटेडने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन क्रू सदस्यांसह उड्डाण केले होते.

डीजीसीएने आपल्या तपासणीत आढळले की एअर इंडियाने फ्लाईट क्रू मेंबर्सच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे योग्य पालन केले नाही. कंपनी क्रू मेंबर्सचे फ्लाइंग ड्युटी अवर्स आणि त्यांचा थकवा लक्षात घेऊन वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकली नाही. त्यामुळे कंपनीला आता हा दंड भरावा लागणार आहे.

Air India news
CSK vs RCB Ruturaj Gaikwad : मी कोणाचीही जागा भरून काढणार नाही... पहिल्या टॉसवेळी CSK चा नवा कर्णधार काय म्हणाला?

निवेदनानुसार, विमान कंपनी आपल्या क्रू सदस्यांना पुरेशी साप्ताहिक विश्रांती आणि लांब उड्डाणांच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती प्रदान करण्यात अयशस्वी ठरली. डीजीसीएने 1 मार्च रोजी एअर इंडियाला उल्लंघनाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला एअरलाइनने दिलेले उत्तर समाधानकारक आढळले नाही. (Latest Marathi News)

क्रू मेंबर्ससाठी किती विश्रांती आहे आवश्यक-

DGCA ने अलीकडेच क्रू मेंबर्सचा थकवा दूर करण्यासाठी नवीन नियम केले आहेत. त्यानुसार देशातील वैमानिकांना आठवड्याच्या अखेरीस 48 तासांची विश्रांती देण्यात यावी, जी पूर्वी 36 तासांची होती. रात्रीची ड्युटी देखील मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत असेल, तर पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी उड्डाणाचे तास आता 13 वरून 10 तासांवर आणले आहेत.

Air India news
Elvish Yadav Bail: एल्विश यादवला जामीन मिळाला पण तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही, काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.