Plastic Pollution : प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध जागृती!

दमणहून दोन मलींसह ११ हजार कि.मी.चा सायकल प्रवास
Awareness against plastic pollution 11 thousand km cycle travel
Awareness against plastic pollution 11 thousand km cycle travel
Updated on

लखनौ : सातत्याने वाढत्या प्लॅस्टिक प्रदूषणाबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त केली जाते. मात्र, प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फार कमी जण स्वत:हून प्रयत्न करतात. एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी अनिल चौहान या व्यक्तीने दमण आणि दीवहून सायकलयात्रेस सुरूवात केली आहे.

दमणहून सुमारे ११ हजार कि.मी.चे अंतर कापत ते सायकलने उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत पोचले आहेत. बांगलादेशला जाण्याचेही त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, चौहान यांच्या श्रेया व युक्ती या अनुक्रमे सात व चार वर्षांच्या मुलीही त्यांच्यासोबत आहेत. चौहान यांनी यावर्षी एक जानेवारी रोजी आपल्या सायकलप्रवासास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी गोवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली व मध्य प्रदेशमधून प्रवास केला. सायकलवरून ते मुले व नागरिकांना एकेरी वापराचे प्लॅस्टिक टाळण्याचे आवाहन करत आहेत.

स्वत:सोबत केवळ एक पिशवी व दोन ब्लॅंकेट त्यांनी घेतल्या असून गेली सात महिने त्यांचा प्लॅस्टिकविरुद्ध सायकलवरून हा प्रवास सुरू आहे. ते दररोज रात्री मंदिर, बस थांबा, रेल्वे स्थानक किंवा एखाद्या धर्मशाळेत मुक्काम करतात. आपल्या मोहिमेविषयी जाणून घेतल्यावर लोकच त्यांना अन्नपाणी देत आहेत. या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शाळा प्रशासन, स्थानिकांशी ते संवाद साधतात.

दोन लहान मुलींसह खडतर सायकलप्रवास का सुरू केला, असे विचारल्यावर ते म्हणाले, की एकेरी वापराच्या प्लॅस्टिकमुळे होणारे गायींचे मृत्यू टाळण्याचा माझ्या सायकल मोहिमेचा उद्देश आहे. कचऱ्यात फेकलेल्या अशा प्लॅस्टिकमुळे देशात बहुतेक गायींचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे, गायींच्या आजारपणामागेही प्रामुख्याने प्लॅस्टिक कारणीभूत आहे. चौहान यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे. ही मोहीम दीर्घकालीन असल्याने मुलींनाही सोबत घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते सायकलवरूनच बांगलादेशलाही जाणार असून त्यासाठी स्वत:सह दोन मुलींचाही पासपोर्ट काढला आहे. लवकरच व्हिसा मिळण्याची त्यांना आशा आहे.

प्लॅस्टिकचा भस्मासूर

३.५ कोटी टन - दरवर्षी भारतात निर्मिती होणारे प्लॅस्टिक

३ किलो - प्लॅस्टिकचा दरडोई वार्षिक वापर

मी माझ्या दोन मुलींसह सायकलवरून प्लॅस्टिकविरुद्ध मोहिमेस सुरुवात केल्यावर दमण आणि दीवमधील नागरिकांनी त्यांची चेष्टामस्करी केली. मात्र, मी स्वत:चे कर्तव्य समजून या मोहिमेस सुरुवात केली. एकदाच वापरण्याच्या प्लॅस्टिकबद्दल देशात अनेक नियम आहेत. मात्र, त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. अशा प्लॅस्टिकच्या उत्पादनाविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. एकेरी वापराच्या प्लॅस्टिकच्या वस्तू बनविणाऱ्या कंपन्या बंद होईपर्यंत हे सुरूच राहील.

- अनिल चौहान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.