Arun Yogiraj : राम लल्लाची मूर्ती बनवणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने नाकारला व्हिसा; कारण काय?

Mandir Ram Lalla idol maker Arun Yogiraj: अरुण योगीराज यांना एका कार्यक्रमासाठी अमेरिकेमध्ये जायचं आहे, पण त्यांना अमेरिकेने परवानगी नाकारली आहे. 'रिपब्लिक टीव्ही'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.
Arun Yogiraj
Arun Yogiraj
Updated on

नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरातील राम लल्लाची प्रसिद्ध मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली आहे. त्यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. अरुण योगीराज यांना एका कार्यक्रमासाठी अमेरिकेमध्ये जायचं आहे, पण त्यांना अमेरिकेने परवानगी नाकारली आहे. 'रिपब्लिक टीव्ही'ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

अरुण योगीराज यांना १२ व्या AKKA वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत जायचं होतं. ते ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर यादरम्यान कॉन्फरन्स वर्जिनियाच्या रिचमंड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. व्हिसा न मिळाल्यामुळे अरुण योगीराज यांच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. अरुण योगीराज यांनी अमेरिकेमध्ये जाण्याची पूर्ण तयारी केली होती.

Arun Yogiraj
Ram Rahim: वाढदिवसाचे औचित्य अन् निवडणुकीची चाहूल, गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर!

अरुण यांच्या पत्नीला याआधी अमेरिकेने व्हिसा दिला आहे. त्या अमेरिकेत गेल्या होत्या, पण आता अरुण योगीराज यांना व्हिसा नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अरुण योगीराज यांनी व्हिसा नाकारण्यात आल्याच्या गोष्टीची पुष्टी केली आहे.

अरुण योगीराज म्हणाले की, मला का व्हिसा नाकारण्यात आला हे माहिती नाही. पण, मी व्हिसा संदर्भातील सर्व कागदपत्रं जमा केले होते. माहितीनुसार, AKKA वर्ल्ड कन्नड कॉन्फरन्स वर्षातून दोनवेळा आयोजित केली जाते. या कार्यक्रमाचा उद्देश अमेरिकेसह जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या समूदायाला एकत्र आणण्याचा असतो.

Arun Yogiraj
Ram Temple: राम मंदिराचे काम संथ गतीने; मजुरांनी सोडलं काम, परत येण्यास नकार; कारण काय?

या वर्षीच्या सुरुवातीला अयोध्येमध्ये राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे शुभकार्य झाले होते. मूर्ती बनवण्याचा मान अरुण योगीराज यांना मिळाला होता आणि त्यांचीच मूर्ती स्विकारण्यात आली. राम लल्लाची मूर्ती बनवून अरुण योगीराज हे देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. राम लल्लाची मूर्ती एकदम आकर्षक आहे. त्यामुळे अरुण योगीराज यांचे देशभरात कौतुक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.