अहमदाबाद : २३ वर्षीय आएशानं आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेला एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. साबरमती नदीमध्ये उडी मारत तिने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. त्याआधी तिने एक शेवटचा कॉल तिच्या आई-वडिलांना केला होता. त्याची ऑडिओ क्लिपही आता समोर आली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी आएशाने तिच्या आई-वडिलांशी संवाद साधला. तिच्या पालकांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आरिफनं (तिचा नवरा) तिला आत्महत्या करण्यास सांगितलं होतं. यापुढे मी जगणार नाही, मी कंटाळले आहे. तुम्हाला आणखी किती त्रास देऊ, खूप उशीर झाला आहे. आता मला जगण्याची काहीही इच्छा नाही, असं आएशा म्हणत आहे.
नवऱ्यानं सांगितलं जीव देतानाचा व्हिडिओ पाठव
आएशाचे वडील लियाकत अली तिच्याशी बोलत होते तेव्हा आएशा म्हणाली की, मी साबरमती नदीच्या पुलावर उभी आहे, असं आरिफला सांगितलं तेव्हा त्यानं मला 'तू जीव दे आणि त्याचा व्हिडिओ मला पाठवून दे,' असं म्हणाला.
लियाकत अली यांनी आएशाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिला कुराणाची शपथही दिली, पण ती फक्त रडत राहिली. तिला आरिफ घ्यायला येत नाही, असंही ती म्हणाली. तिचे आरिफशी काही वाद झाले होते, तेव्हा आरिफनं तिला तू जीव दे असं म्हटल्यानं ती मनातून पूर्णपणे तुटून गेली होती.
शांतपणे मला जाऊ द्या
आएशानं आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेनुसार करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मला अल्लानं इतकचं आयुष्य दिलं आहे. आणि आता मी शांततेनं जगाचा निरोप घेऊ इच्छिते. आणि पप्पा आणखी किती दिवस तुम्ही आपल्याच माणसांशी झगडत राहणार आहात? माझ्यामागे कुणीही भांडणं करू नका, असं म्हणत तिनं आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
आएशाचा नवरा हुंड्यासाठी द्यायचा त्रास
व्यवसायाने टेलर असलेले आएशाचे वडील लियाकत अली म्हणाले, जालौर (राजस्थान) इथं राहणाऱ्या आरिफ खानसोबत २०१८मध्ये आएशाचं लग्न झालं होतं, पण लग्नानंतर तिचा सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरवात केली. काही दिवसांनंतर आरिफने हुंड्याची मागणी करत आएशाला घरी आणून सोडले. नातेवाईकांनी समजावल्यावर तो पुन्हा आएशाला सासरी घेऊन गेला. पण २०१९मध्ये त्यानं पुन्हा आएशाला आमच्याकडे आणून सोडलं. आरिफच्या घरच्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. आम्ही कसेबसे दीड लाख गोळा करत त्यांना ते दिले होते.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.